छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरने एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी राणादा आणि पाठकबाई ही जोडी कायमच सर्वांची लाडकी ठरते. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आता पाठकबाईंनी सासऱ्यांना गिफ्ट दिले आहे.
हार्दिक आणि अक्षयाने ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपल्यानंतर लगेच गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक कलाकार आणि कुटुंबीय हजर होते. त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. प्रत्येक येणारा सण ते आनंदाने साजरा करतात. तसेच नुकताच हार्दिकने वडिलांचा वाढदिवस देखील आनंदाने साजरा केला. अक्षयाने सासऱ्यांसाठी आलिशान गाडी खरेदी केली आहे.
वाचा: देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट
हार्दिकने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, “माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी हे खास गिफ्ट Happy Birthday पप्पा” असे कॅप्शन दिले आहे. तसेच दुसऱ्या व्हिडीओमध्ये गाडी खरेदी करताना दिसत आहेत. यावेळी संपूर्ण जोशी कुटुंबीय एकत्र असल्याचे दिसत आहे. यावेळी अक्षया देखील तेथे उपस्थित होती. अक्षयाने देखील सोशल मीडियावर सासऱ्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. “Happy Birthday पप्पा” म्हणत तिने सासऱ्यांसोबत नव्या गाडीचा फोटो शेअर केला आहे.