Tuzech Mi Geet Gaat Aahe 23rd Oct: मल्हारच्या अडचणी वाढणार; स्वरा आयत्यावेळी बदलणार स्वतःचा निर्णय!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tuzech Mi Geet Gaat Aahe 23rd Oct: मल्हारच्या अडचणी वाढणार; स्वरा आयत्यावेळी बदलणार स्वतःचा निर्णय!

Tuzech Mi Geet Gaat Aahe 23rd Oct: मल्हारच्या अडचणी वाढणार; स्वरा आयत्यावेळी बदलणार स्वतःचा निर्णय!

Published Oct 23, 2023 01:28 PM IST

Tuzech Mi Geet Gaat Aahe 23rd October 2023 Serial Update: शुभंकर गायब झाल्यानंतर आता स्वराच्या कस्टडीवरून पुन्हा गोंधळ निर्माण होणार आहे. स्वरा नक्की कुणाकडे राहणार यावरून आता चांगलाच वाद रंगला आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe
Tuzech Mi Geet Gaat Aahe

Tuzech Mi Geet Gaat Aahe 23rd October 2023 Serial Update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये आता मल्हारच्या अडचणी वाढताना दिसणार आहेत. स्वराची कस्टडी मिळवण्यासाठी मल्हार खूप मेहनत घेत आहे. तर, मोनिका स्वराला त्रास देतेय ही गोष्ट देखील मल्हारला कळली आहे. त्यामुळे मल्हार स्वराला तिच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आता आयत्यावेळी स्वरा आपला जबाब बदलणार आहे. त्यामुळे मल्हारला देखील धक्का बसणार आहे.

शुभंकर गायब झाल्यानंतर आता स्वराच्या कस्टडीवरून पुन्हा गोंधळ निर्माण होणार आहे. स्वरा नक्की कुणाकडे राहणार यावरून आता चांगलाच वाद रंगला आहे. मालिकेच्या कथानकात मोनिका मंजुळावर आरोप करताना दिसली होती. तर, यात ती स्वराला देखील बोल लागावत होती. स्वराचा बाबा बनून आलेला शुभंकर जसा खोटा माणूस निघाला, तशीच ही बाई देखील खोटारडी आहे, असा आरोप मोनिका मंजुळावर केला होता. शुभंकरच्या गायब होण्यामागे मंजुळाचा हात असल्याचे म्हटले होते. हे सगळं मंजुळाने घडवून आणलं आहे आणि ती हे सगळं पैशासाठी करत असल्याचं मोनिका म्हणत आहे. मात्र, यावेळी स्वरा मंजुळाच्या बाजूने भांडताना दिसली होती.

यानंतर आता स्वरा कुणाकडे राहणार यावरून कोर्टात केस रंगणार आहे. यावेळी जज स्वतः स्वराला कुणाकडे राहायचे आहे, हे विचारणार आहे. त्यावेळी मल्हार स्वराला मंजुळाकडे राहण्याचा सल्ला देणार आहे. तर, स्वरा मात्र आता आयत्यावेळी मंजुळाऐवजी मोनिकाकडे राहण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे तिच्या या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. स्वराने आयत्यावेळी असा निर्णय का घेतला, यावरून आता सगळ्यांचाच गोंधळ उडणार आहे. स्वरा नक्की कुणाची मुलगी आहे आणि कुणाकडे राहणार यावरून मल्हार आणि शुभंकरमध्ये जोरदार वाद झाले होते. या दरम्यान आता शुभंकर गायब झाला होता. आता शुभंकर नक्की गेला कुठे असेल, त्याला कुणी मारलं तर नाही ना? याचा शोध पोलीस घेत होते.

Whats_app_banner