मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराला तिचे बाबा भेटणार अन् प्रेक्षकांना धक्का बसणार! मालिकेत पुढे काय होणार? वाचा..

Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराला तिचे बाबा भेटणार अन् प्रेक्षकांना धक्का बसणार! मालिकेत पुढे काय होणार? वाचा..

Sep 20, 2023 03:14 PM IST

Tuzech Mi Geet Gaat Aahe 20 September 2023: मल्हार हेच आपले वडील आहेत, हे स्वराला माहित आहे. परंतु, मल्हार या सत्यापासून अनभिज्ञ आहे. त्याला स्वरा ही आपली मुलगी आहे, याबद्दल काहीही माहित नाही.

Tuzech Mi Geet Gaat Aahe
Tuzech Mi Geet Gaat Aahe

Tuzech Mi Geet Gaat Aahe 20 September 2023: तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता एका नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. येत्या काही भागांमध्ये स्वराला तिचे बाबा भेटणार आहे. मात्र, या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वरा तिच्या बाबांची आतुरतेने वाट बघत आहे. स्वराला आपल्या बाबांबद्दल सगळी माहिती आहे. मात्र, एक दिवस आपले बाबा स्वताहून आपल्याला ओळखतील अशी आशा तिला आहे. मात्र, आता स्वराला देखील मोठा धक्का बसणार आहे. एकीकडे मल्हार स्वराला आपली मुलगी मानत आहे. परंतु, आता मल्हार तिला एक सरप्राईज देणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मल्हार हेच आपले वडील आहेत, हे स्वराला माहित आहे. परंतु, मल्हार या सत्यापासून अनभिज्ञ आहे. त्याला स्वरा ही आपली मुलगी आहे, याबद्दल काहीही माहित नाही. दुसरीकडे, मोनिकाचा लग्नाआधीचा बॉयफ्रेंड म्हणजेच शुभंकर तिच्या आयुष्यात परतला आहे. तर, मोनिकाची मुलगी ही आपली मुलगी असल्याची कुणकुण त्याला लागली आहे. त्यामुळे तो आपल्या मुलीचा शोध घेत आहे. या दरम्यान तो कुणालाही न सांगता स्वरा आणि पीहूची डीएनए टेस्ट करणार आहे. यातून तो आपली मुलगी शोधून तिला सोबत घेऊन जाणार आहे.

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! पोस्ट लिहित म्हणाली...

शुभंकर याने पीहू आणि स्वराची डीएनएन टेस्ट केली आहे, हे लक्षात आल्यानंतर मोनिकाने शक्कल लढवून दोन्ही मुलींचे मेडिकल रिपोर्ट बदलले. यामुळे आता पीहू आणि स्वराचे रिपोर्ट्स एकमेकींसोबत बदलले गेले आहेत. तर, दुसरीकडे आता शुभंकरचा देखील मोठा गैरसमज होणार आहे. शुभंकरने स्वराला आपली मुलगी समजणार आहे. एकीकडे तो मल्हारला आपण एक मुलगी सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगणार आहे. मात्र, मल्हार या गोष्टीसाठी राजी नाही. त्यामुळे आता शुभंकर मल्हारला याचा पुरावा देणार आहे.

स्वरा आणि पीहूचे रिपोर्ट बदलले गेल्यामुळे शुभंकर स्वराला आपली मुली समजत आहे. आता डीएनए टेस्टचे रिपोर्ट शुभंकर मल्हारला देणार आहे. यानंतर आता मल्हार स्वराचा ताबा शुभंकरला द्यायला तयार होणार आहे. एकीकडे स्वराला वाटत आहे की, मल्हार तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारेल. परंतु, आता मल्हार तिला शुभंकर तुझा बाबा असल्याचे सांगणार आहे. हे ऐकून स्वराला मोठा धक्का बसणार आहे. आता ती पुढे काय निर्णय घेणार? मल्हारला सत्य कळणार? याची उत्तरं येत्या भागांमध्ये मिळणार आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग