Tuzech Mi Geet Gaat Aahe 15 September 2023: चिमुकल्या स्वराच्या आयुष्यात आता एक अतिशय कठीण वळण येणार आहे. इतक्या लहान वयात आता स्वराला अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वरा मुलगा नसून मुलगी असल्याचं सत्य मोनिकाने सगळ्यांसमोर उघडकीस आणले आहे. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मोनिका स्वराला धमकावण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वराने या घरातून निघून जावे आणि पीहूला सगळ्यांचे प्रेम मिळावे यासाठी मोनिका रोजच नवनवे कट रचत आहे.
स्वराज हा मुलगा नसून, ती मुलगी आहे, हे सत्य आता मोनिकाने सगळ्यांना सांगितले. तिने केवळ सांगितलेच नाही, तर स्वराचे खरे रूप देखील सगळ्यांसमोर आणले. आता पुन्हा एकदा मोनिका स्वराला धमकावणार आहे. मोनिका स्वराला घाबरवण्यासाठी म्हणणार आहे की, ‘मी आता केवळ तुझं मुलगी असल्याचं सत्य समोर आणलं आहे. आता तुझ्याबाद्ल आणखी काही वेगवेगळी गुपितं सगळ्यांसमोर आणली तर तुझं काय होईल, याचा आता तू विचार कर...’ आता मोनिकाच्या या धमकीमुळे स्वरा देखील बिथरणार आहे.
अवघ्या ८-१० वर्षांची स्वरा इतक्या लहान वयात देखील अनेक कठीण संकटांचा सामना करत आहे. लहान वयातच तिची आई तिच्यापासून दुरावली. तिने जन्मापासून आपले बाबा पाहिलेले नाहीत. आईच्या निधनानंतर तिला स्वतःच्या घरापासून आणि आईसारखं प्रेम करणाऱ्या मामापासून दूर जावे लागले होते. आता तिला आपल्या खऱ्या बाबांची ओळख पटली आहे. मात्र, त्यांना जोपर्यंत आपल्याबद्दल प्रेम वाटत नाही, तो पर्यंत या गोष्टीचा खुलासा होऊ देणार नाही, असा निर्णय स्वराने घेतला आहे.
एकीकडे स्वरा एकटी पडत असताना, आता तिच्या मदतीला मंजुळा धावून येणार आहे. मंजुळा ही वैदहीसारखी दिसणारी आहे. स्वरा मंजुळाला आपली आई वैदही समजत आहे. मोनिका स्वराला धमकी देत असताना आता मंजुळा मध्ये पडून मोनिकाला धमकावताना दिसणार आहे. मंजुळा जरी स्वराची आई नसली, तरी ती तिचा आईप्रमाणे सांभाळ करत आहे.
संबंधित बातम्या