Tuzech Mi Geet Gaat Aahe 12th October 2023 Serial Update: स्वरा आणि पीहू या दोन्ही बहिणींच्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे. मल्हार आणि शुभंकर यांच्या वादात आता स्वराला नाहं त्रास भोगावा लागणार आहे. स्वरा कुणाकडे राहणार, यावरून चांगलाच क्लेश सुरू झाला आहे. दोघांची भांडणं आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली आहेत. दोघांचे वाद पाहून पोलिसांनी स्वराचा ताबा एका एनजीओकडे दिला आहे. त्यामुळे आता स्वराला घरापासून दूर एका आश्रमात राहावं लागणार आहे. तर, दुसरीकडे शुभंकरने मल्हारला पीहूच्या जीवाची धमकी दिली आहे.
जर, स्वरा माझ्यापासून दुरावली तर, पीहूला देखील तू मुकशील अशी धमकी शुभंकरने मल्हारला दिली आहे. तर, स्वरा कुणाकडे राहणार यावरून शुभंकर आणि मल्हार यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोघांनीही स्वरावर आपापला अधिकार सांगितला आहे. मल्हार स्वरा आपल्या घराचा भाग असल्याचं सांगत आहे. तर, शुभंकर देखील ती आपली मुलगी असल्याचा दाखला देत आहे. त्याच्याकडे स्वतःचे आणि स्वराचे डीएनए रिपोर्ट्स आहेत. मात्र, हे रिपोर्ट्स खोटे असल्याचे शुभंकरला माहित नाही. तो याच रिपोर्ट्सचा दाखला देऊन तो स्वराचा बाबा असल्याचे सांगत आहे.
आता स्वरा एनजीओमध्ये राहत असताना ती कीडनॅप होणार आहे. स्वरा एनजीओमधून अचानक गायब होणार आहे. आता स्वरा नेमकी कुठे गेली? तिला नक्की कुणी उचलून नेलं? याचा शोध घेण्यासाठी आता चांगलीच धावपळ होणार आहे. सगळ्यांचा संशय शुभंकरवर जाणार आहे. शुभंकरनेच स्वराला एनजीओमधून पळवून नेलं असावं असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र, यावेळी स्वतः शुभंकर देखील सगळ्यांसोबत स्वराची शोधाशोध करताना दिसणार आहे. यामुळे त्याच्यावरची संशयाची सुई आता दुसरीकडे वळणार आहे.
स्वराला नक्की कुणी पळवून नेलं असावं, याचा शोध घेण्यासाठी आता सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाणार आहे. यात तिला पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसणार आहे. यावरून आता कीडनॅपरची ओळख पटणार आहे. यामागचं सत्य आता लवकरच समोर येणार आहे.