विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई-tushar hiranandani movie srikanth box office collection day 1 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
May 11, 2024 08:58 AM IST

अभिनेता राजकुमार याचा 'श्रीकांत' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाण्यापूर्वी जाणून घ्या 'श्रीकांत'ची कमाई
विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाण्यापूर्वी जाणून घ्या 'श्रीकांत'ची कमाई

नुकताच 'श्रीकांत' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. या चित्रपटात राजकुमार राव, अलाया एफ, ज्योतिका आणि शरद केळकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी 'श्रीकांत' या चित्रपटाने कमी कमाई केली आहे. ही कमाई केवळ २.२५ कोटी रुपये आहे. यापूर्वी १२वी फेल, लापता लेडीज, मडगाव एक्सप्रेस आणि स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटांनी देखील पहिल्या दिवशी अशीच कमाई केली होती. पण या सर्वच चित्रपटांनी नंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता 'श्रीकांत' चित्रपटाविषयी देखील असेच म्हटले जात आहे.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

इतर चित्रपटांचीही पहिल्या दिवसाची कमाई फार कमी

१२वी फेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी एक कोटी रुपयांची देखील कमाई केली नव्हती. पण नंतर चित्रपटाने ५७.५० कोटी कमावले. त्यानंतर लापता लेडीज चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ७० लाख रुपयांची कमाई केली होती. पण नंतर चित्रपटाने जवळपास १८-१९ कोटी रुपये कमावले. मडगाव एक्सप्रेस आणि स्वातंत्र्य वीर सावरकर या दोन्ही चित्रपटांनी देखील पहिल्या दिवशी फार कमाई केली नव्हती. पण नंतर चित्रपटाच्या कमाईत जवळपास २० टक्के वाढ झाली. आता श्रीकांत चित्रपटाविषयी देखील असाच अंदाज वर्तवला जात आहे.
वाचा: 'तुला पाहाते रे'नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

श्रीकांत चित्रपटाचे बजेट

'श्रीकांत' हा चित्रपट बिग बजेट सिनेमा नाही. या चित्रपटाचे ओटीटी हक्क विकल्यामुळे चित्रपटाची कमाई चांगली झाल्याचे म्हटले जात आहे. पण बॉक्स ऑफिसवर जेव्हा चित्रपट ५० कोटी रुपये कमावेल तेव्हाच सिनेमा हिट झाल्याचे म्हटले जाईल. या चित्रपटात एका अंधळ्या व्यावसायिकाची कथा दाखवण्यात आली आहे. आता विकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार हे लवकरच कळेल. त्यामुळे तुम्ही विकेंडला चित्रपट पाहण्याचा प्लान करत असाल तर हा चित्रपट चांगली चॉइस ठरु शकता.
वाचा: ती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत