मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ट्युमरने त्रस्त असलेल्या राखी सावंतला मिळाली जीवे मारण्याची धमकी; तरीही तक्रार केली नाही! कारण काय?

ट्युमरने त्रस्त असलेल्या राखी सावंतला मिळाली जीवे मारण्याची धमकी; तरीही तक्रार केली नाही! कारण काय?

May 22, 2024 08:26 AM IST

अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. राखी सावंत हिला ट्युमर झाल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.

ट्युमरने त्रस्त असलेल्या राखी सावंतला मिळाली जीवे मारण्याची धमकी; तरीही तक्रार केली नाही! कारण काय?
ट्युमरने त्रस्त असलेल्या राखी सावंतला मिळाली जीवे मारण्याची धमकी; तरीही तक्रार केली नाही! कारण काय?

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. राखी सावंत हिला ट्युमर झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तिच्या ट्यूमरवर उपचार सुरू आहेत. यावेळी, राखीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंह आहे. रितेश सिह राखी सोबत ‘बिग बॉस’मध्ये देखील झळकला होता. तो सध्या राखीच्या प्रकृतीविषयी सगळ्यांना माहिती देताना दिसत आहे. त्याने नुकतीच राखीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे मीडियाला सांगितले. या दरम्यान, आता राखीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. राखीचा एक्स-पती रितेश याने याबाबत सांगितले होते. मात्र, आता राखीच्या वकिलानेही याची पुष्टी करत म्हटले की, होय, राखीला धमकीचे फोन येत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'ई टाईम्स'शी बोलताना राखीची वकील फाल्गुनी म्हणाली की, 'माझी क्लायंट राखी सावंत हिला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं मला कळलं आहे. तिला सतत जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. आम्ही तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले आहे, पण तिची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ती सध्या काहीही करू शकणार नाही. मात्र, तिला डिस्चार्ज मिळताच ती पहिली तक्रार करणार आहे.’

शाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! 'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या खास शुभेच्छा!

राखीची प्रकृती चिंताजनक!

याआधी मीडियाशी बोलताना रितेश सिंह याने सांगितले होते की, 'राखी सावंत हिचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. पण तिची प्रकृती अजूनही थोडी नाजूक आहे. तिची शुगर आणि बीपी कमी होत आहे. गेल्या काही काळापासून ती खूप तणावाखाली होती. आता तिला काही महिने अंथरुणावर सक्तीची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. सध्या त्याला १५ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.

धमकी देणाऱ्यांना रितेशचा संदेश

राखी सावंत हिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे रितेश सिंहने मीडियाला सांगितले होते. राखीला धमक्या येत असल्याचे मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे, असे तो म्हणाला होता. कोणीतरी तिला सतत जीवे मारण्याच्या धामक्या देत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, लवकरच पुढील सर्व तपशील देऊ. जे आम्हाला धमक्या देत आहेत, त्यांनी आमच्यापासून दूर राहावे. मला किंवा राखीला काही झालं, तर बघा मी काय करतो, असा इशारा देखील रितेश सिंह याने दिला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग