Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होताना दिसत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही चित्रपटांनी तर अपेक्षा पेक्षा जास्त कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील हॉरर चित्रपट तुंबाड चित्रपटगृहामध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अभिनेत्री करीन कपूरच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला देखील टक्कर दिली आहे.
'तुंबाड' हा हॉरर चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करत आहे. तुंबाडसोबतच करिना कपूरचा 'द बकिंगहॅम मर्डर' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'तुंबाड' हा काही मोजक्याच स्क्रीनवर पुन्हा प्रदर्शित झाला. तरीही पहिल्या दिवशी चित्रपटाने ७.२ कोटी रुपयांची कमाई केली. तर 'द बकिंगहॅम मर्डर' या चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तुंबाड हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याची ओपनिंग वीकेंड कमाई ३.२५ कोटी रुपये होती. मात्र, रि-रिलीजमध्ये चित्रपटाची कमाई रिलीजपेक्षा जास्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा चित्रपट थिएटरमधून केवळ १३.२५ कोटींची कमाई करू शकला होता. यावेळी हा चित्रपट याच वेगाने चालत राहिला तर लवकरच तो प्रदर्शनाचा टप्पा पार करेल. सनिल्कच्या रिपोर्टनुसार, तुंबाडने पहिल्या वीकेंडमध्ये ७.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
तुंबाडची पहिल्या दिवसाची कमाई १.६ कोटी रुपये होती. दुसऱ्या दिवशी २.६ कोटी, त्यानंतर ओपनिंग वीकेंडला रविवारपर्यंत ३ कोटी रुपये झाली आहे. तीन दिवसात चित्रपटाने देशांतर्गत ७.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे पुन्हा प्रदर्शित झालेल्या मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाने ७.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. किल चित्रपटाने देखील ६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
द बकिंगहॅम मर्डर्सचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून यात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. थ्रिलर प्रकारातील हा मेहता यांचा पहिला प्रोजेक्ट आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही. या चित्रपटापेक्षा रि-रिलीज चित्रपट जास्त कमाई करताना दिसत आहेत.