'कहो ना प्यार है' हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि अमिषा पटेलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील गाणे 'कहो ना प्यार है' हे एका आयलंडवर शूट झाले होते. आता त्याच आयलंडवर मराठी मालिकेतील कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कोणते कलाकार तेथे गेले आहेत.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अक्षरा आणि अधिपती हे फिरायला थायलंडला गेले आहेत. जिथेले आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना दिसणार आहेत तुमचे लाडके अक्षरा- अधिपती. सध्या सोशल मीडियावर एकाच व्हिडिओचा कल्ला सुरु आहे तो म्हणजे अधिपती-अक्षराचा थायलंड मधला 'कहो ना प्यार हैं' गाण्याचा प्रोमो. हा प्रोमो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट झाला आहे. तेथेच ही जोडी पोहोचली आहे.
अधिपती ही भूमिका मालिकेत हृषिकेश शेलारने साकारली आहे. त्याने थायलंड फिरतानाचा अनुभव सांगितला आहे. "माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं. ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली. मुंबई मध्ये आमची किमान ५०-६० जणांची टीम असते पण थायलंडला आम्ही १५-१६ जणच होतो. तिथे शूटिंगच सगळं सांभाळायला आणि ती एक वेगळीच तारे वरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होत पण त्यात खूप मज्जा आली. आमची टीम, निर्माते, चॅनल, सर्वच इतके सपोर्टिव्ह आहेत की सगळं छानपणे पार पडलं" असे हृषिकेश म्हणाला.
पुढे हृषिकेश म्हणाला की, "तुम्ही अधिपती-अक्षरावर चित्रित झालेलं जे गाणं पाहत आहात ते आम्ही आयलंडवर शूट केलं . तिथे आमच्याकडे खूप कमी वेळ होता आणि त्यात आम्हाला गाणंही शूट करायच होत. सीन सुद्धा करायचा होता. ह्याच आयलंडवर 'कहो ना प्यार हैं' च्या ओरिजिनल गाण्याचं चित्रीकरण झालंय. त्याच ठिकाणी आम्ही ही ते गाणं पुन्हा रीक्रिएट केलं खूप भन्नाट अनुभव होता. पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले कारण आमच्या हातात एकचं दिवस होता. त्यात ही जोरदार पाऊस आला मध्यंतरी आम्ही बोटचा प्रवास करून त्या आयलंडवर पोहोचलो शूटसाठी सुरुवात केली आणि पाऊस कोसळायला लागला आम्हाला शूट थांबवावं लागलं. असाही ही प्रश्न पडला की आम्हाला परत जात येईल का इथून. खूप पाऊस होता तिथे. जवळपास २ तासांनी पाऊस थांबला आणि आम्ही गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली. खूपच छान अनुभव होता."
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया
हा तर फक्त एक ट्रेलर आहे कारण अक्षरा-अधिपती तिथे अजून काय काय करणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार असल्यामुळे चाहते उत्सुक झाले आहेत. मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या