मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 07, 2024 01:35 PM IST

अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी आलेली सरगम अधिपतीशी जास्तच मैत्रीपूर्वक संबंध करु पाहताये, ही गोष्ट अक्षराला खटकतेय.

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट
सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक सध्या भरभरून पसंती देताना दिसत आहेत. या मालिकेत येणाऱ्या ट्वीस्टमुळे ही मालिका आणखीन रंजक झाली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. सध्या या मालिकेच्या कथानकात अक्षरा आणि अधिपती यांच्यात प्रेम फुलताना दिसत आहे. मात्र, या दोघांचे प्रेम भुवनेश्वरीला अजिबातच बघवत नाहीये. दोघांच्या या गोड नात्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी आता भुवनेश्वरी एका व्यक्तीला घरात घेऊन आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अधिपतीने गाणं शिकावं, ही अक्षराची इच्छा असल्याने तिने प्रयत्न देखील सुरू केले होते. तर, भुवनेश्वरने हीच संधी साधून अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी सरगम नावाच्या एका शिक्षिकेला घरात आणलं आहे. हीच सरगम आता अधिपती आणि अक्षरा यांच्या आयुष्याचे जुळलेले सूर मोडायला निघणार आहे. अधिपतीला गाण्याची आवड असते. त्याला गाणं शिकायचं असतं, म्हणून चारूहास आणि अक्षरा भुवनेश्वरीकडे त्याची परवानगी मागतात. भुवनेश्वरी देखील अधिपतीला गाणं शिकण्याची परवानगी देते. मात्र, यासाठी शिक्षिका मी स्वतः घेऊन येईन, असं म्हणत ती सरगमला घरात घेऊन येते.

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

अक्षराला वाटणार वाईट!

अतिशय ग्लॅमरस असलेली सरगम अधिपतीच्या घरात आल्यावर चांगलाच गोंधळ सुरू झाला आहे. अक्षराला पहिल्या दिवसापासूनच सरगम अजिबातच पटत नाही. तर, अक्षराचा होणारा जळफळाट पाहून भुवनेश्वर आता नवा डाव आखत आहे. अधिपतीच्या आयुष्यात आता तू स्थान मिळवायचं असं भुवनेश्वरीने सरगमला सांगितलं आहे. तर, या आपल्या शिक्षिका म्हणून सवयीप्रमाणे अधिपती सरगमला देखील मास्तरीण बाई म्हणायला लागला आहे. मात्र, यामुळे अक्षरात चांगलीच दुखावली गेली आहे. आजतागायत अधिपतींच्या आयुष्यात मास्तरीण बाई ही जागा केवळ आपलीच होती. मात्र, आता सरगम ही जागा घेऊ पाहते आहे अक्षराच्या लक्षात आलं आहे. गाणं शिकवायचं सोडून सरगम आणि अधिपती गप्पा मारत बसतात, तेव्हा अक्षरात इथे येऊन सरगमला चांगलेच बोल सुनावणार आहे.

अक्षरा सरगमची माफी मागणार?

अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी आलेली सरगम अधिपतीशी जास्तच मैत्रीपूर्वक संबंध करु पाहताये, ही गोष्ट अक्षराला खटकते. गाणं शिकवण्यासाठी मैत्री करण्याची गरज नाही, फक्त गाणं शिकवा हे अक्षरा स्पष्टपणे सरगमला सांगते. अक्षराचं हे वागणं सगळ्यांनाच कळेनासं होतं. सरगम चिडून निघून जाते. त्यामुळे आता अधिपतीला गाणं कोण शिकवणार हा प्रश्न उभा राहतो. सरगम अक्षरामुळे निघून गेली, असे बोल अक्षराला ऐकून घ्यावे लागतात. भुवनेश्वरी त्यातही तिचा डाव खेळते. ती सरगमला फोन करुन सांगते की, जोवर अक्षरा तुझी माफी मागत नाही, तोवर घरात पाऊल टाकायचं नाही. अधिपतीचं गाणं शिकणं थांबायला नको, हा विचार करुन अक्षरा सरगमची माफी मागून तिला घरी गाणं शिकवायला यायला पुन्हा एकदा तयार करते. मात्र, सरगम एक अट घालते की गाणं शिकवताना अक्षराने आजुबाजुला सुद्धा फिरकायचं नाही. आता अक्षरा ही अट मान्य करेल का?, हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग