हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले-tula shikvin changlach dhada serial get trolled ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले

हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 04, 2024 01:30 PM IST

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत सध्या अधिपती आणि अक्षरा हनीमूनला गेले होते. तेथे शूट झालेल्या सीनवर आता नेटकरी संतापले आहेत.

Tula Shikvin Changlach Dhada
Tula Shikvin Changlach Dhada

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेती अक्षरा आणि अधिपती हे लग्नानंतर हनीमूनला थायलंडला गेले होते. तेथे दोघेही आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना दिसले. दरम्यान, त्यांच्यामधील एक रोमँटिक सीन शूट सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा सीन पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील एका भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये अक्षरा आणि अधिपती यांचा रोमॅन्स दाखवण्यात आला आहे. अक्षराने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर अधिपतीने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. दोघांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'अधिक्षरा रंगून जाणार प्रेमाच्या सप्तरंगात' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संपात

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पहिल्यांदाच एखाद्या मालिकेत इतका रोमँन्स दाखवण्यात आला असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच एका यूजरने 'अरे काय... हे असलं घरात सगळे मिळून बघायला चालत असतं तर अडल्ट पिक्चर बघायला बसलो असतो की आम्हीं घरातले सगळे मिळून' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'ही सीरियल आता घरी पाहाणे बंद केले आहे. खूप आवडती मालिका होती पण आता...' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने थेट 'इमरान हाशमी की पिक्चर है क्या' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वाचा: 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट

भूवनेश्वरीला हकलले घरातून

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दुर्गेश्वरी अक्षराला इजा करण्याचा प्रयत्न करते, पण सुदैवाने अक्षरा त्यातून बचावते आणि संपूर्ण प्लान दुर्गेश्वरीवर उलटतो. अक्षरा आणि अधिपती हनीमून वरून कोल्हापुरात परातलेत. घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते. मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.

विभाग