Tula Shikvin Changlach Dhada Serial : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत भुवनेश्वरीच सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षराची कसरत चालू आहे. भुवनेश्वरी परत आली आहे, या मतावर अक्षरा ठाम आहे. भुवनेश्वरी-चारुलता या भोवऱ्यात अक्षरा पूर्णपणे अडकली आहे. चारुलताच्या म्हणण्यावरुन घरातल्या सगळ्यांनाच यावर विश्वास बसू लागला की, अक्षराला मानसिक उपचारांची गरज आहे. खरं सांगत असून देखील अक्षरावर घरी कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही. पण, अक्षरा वारंवार भुवनेश्वरीला म्हणजेच चारुलताला आता थेट वॉर्निंग द्यायला सुरुवात करणार आहे. अक्षरा आता हे सिद्ध करुन दाखवणार की, चारुलता म्हणजेच भुवनेश्वरी आहे.
अक्षरा अधिपतीकडे हट्ट करते की, बाबा आणि चारुलताचं लग्न थांबवलं पाहीजे. पण, दुसरीकडे चारुलता चारुहासला सांगते की, अक्षराची तब्येत बघता लग्नाचा मुहूर्त अलिकडचाच घेतला पाहीजे. अक्षराला वेडी ठरवण्यात चारुलता यशस्वी होईल? अनपेक्षितपणे, दारात मनोरुग्णालयाची एक व्हॅन अक्षराला घेऊन जाण्यासाठी येते. ही संधी साधून चारुलता तिच्या आणि चारुहासच्या लग्नाची व्यवस्था करते. पण लग्नाच्या दिवशीच, अक्षरा मनोरुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी होते. तिच्या बंदिवासात, अक्षराने काही पुरावे गोळा केलेत. ती सर्वांसमोर भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे उघड करण्यासाठी लग्नात पोहोचणार आहे.
आता अक्षराने दाखवलेल्या पुराव्यांमुळे चारुहास पूर्णपणे हादरणार आहे. तिथेच तिथे अक्षराला हे देखील कळणार आहे की, अधिपतीला या सर्व गोष्टी पहिल्यापासून माहित आहेत. या सगळ्यामुळे अक्षरा आणि अधिपती यांच्यात जोरदार वाद होऊन, अक्षरा अक्षराने घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे.
मालिकेत नवरी म्हणून नटण्याचा आनंद व्यक्त करताना कविता लाड म्हणाल्या की, ‘खासगी आयुष्यात कविता इतकी नटत नाही, पण 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या निमित्ताने आणि खास म्हणजे भुवनेश्वरीमुळे मला खूप नटायला मिळत. एरवी नुसतं नटणं ठीक आहे. पण, मालिकेतलं नटणं चार-पाच दिवस चालत, आता माझं चारूहासचं लग्नाचं शूट चालू आहे, जोपर्यंत शूट संपत नाही तो पर्यंत या मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं. हे सतत लक्षात ठेवणं एक कसरत आहे. त्यामुळे मी तयार झाले की, कॅमेरासमोर उभी राहायच्या आधी एकदा सहायक दिग्दर्शकला सांगते, एकदा तुम्हीही बघा की सर्व ठीक आहे ना... पण मजा येते काम करताना.’