
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या मालिकेतील अधिपती आणि अक्षराच्या जोडीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता ही मालिका थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत अधिपतीला सतत राग येताना दिसत आहे. आता या रागाचा परिणाम त्यांच्या नात्यावर होणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दुर्गेश्वरी अक्षराला इजा करण्याचा प्रयत्न करते, पण सुदैवाने अक्षरा त्यातून बचावते आणि संपूर्ण प्लान दुर्गेश्वरीवर उलटतो. अक्षरा आणि अधिपती हनीमून वरून कोल्हापुरात परातलेत. घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते.
भुवनेश्वरीला घरातून हाकलले हे ऐकून अधिपती चिडतो. हेच कारण की अधिपती आणि अक्षरा हनिमूनला निघाले असताना चारुहास अक्षराला कॉल करतो. तिला सांगतो की तिने कोणत्याही परिस्थितीत अधिपतीशी भुवनेश्वरीला फोनवर बोलू देऊ नये. तो तिला त्याचा कॉल लॉग डिलीट करण्याची सूचना करतो. चारुहास तिला एवढेच सांगतो की ते हनिमूनहून परत येईपर्यंत तिने अधिपतीला भुवनेश्वरीशी संपर्क करू नये. या सगळ्या संवादाच्या मागचे सत्य अक्षराला कळते.
अधिपती आणि चारुहास यांच्यात मोठा वाद होतो. चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखल्याचा व योजनेचा एक भाग म्हणून जाणूनबुजून त्याला आणि अक्षराला त्यांच्या हनीमूनला पाठवल्याचा आरोप अधिपती करतो. अधिपती आणि अक्षरा यांच्यातही मोठी झुंज आहे. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलिस तक्रार ही दाखल करतो. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेऊ शकेल का? दुर्गेश्वरीचा कोणता प्लान तिच्यावरच उलटणार ? अधिपती-अक्षरा मध्ये चारुहासमुळे गैरसमज निर्माण होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
अक्षरा आणि अधिपती हे थायलंडला हनीमूनला गेले होते. त्यांचे तेथे समुद्रकिनारी फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी 'कहो ना प्यार हैं' हे गाणे शूट झालेल्या ठिकाणीच व्हिडीओ शूट केला होता. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
संबंधित बातम्या
