- माई मावशी आणि वल्ली हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी आणि त्यांच्या फुलणार प्रेम तर प्रेक्षकांना आवडतंच आहे. पण त्याच सोबत या मालिकेत एक जोडी अशी आहे ज्यांची नोकझोक सतत चालू असते ते म्हणजे माई मावशी आणि वल्ली.
ट्रेंडिंग न्यूज
ऑन-स्क्रीन जरी या दोघी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते आणि त्यांचा पुरावा म्हणजे अभिज्ञा भावे सोशल मीडियावर शेअर करतात असलेले मजेदार व्हिडीओज. अभिज्ञा सेटवरील मजा-मस्ती व्हिडिओजच्या रूपात आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकीतच सोशल मीडियावर माई मावशी आणि वल्ली यांचा एक मजेदार व्हिडिओ प्रेक्षकांनी पाहिला आणि हसून हसून लोटपोट झाले. या व्हिडिओ मध्ये अभिज्ञा लाली मावशींना म्हणते कि "अहो मावशी आपल्या समोरच्या चाळीचे मालक कोमात गेले." त्यावर मावशी मिश्कीलपणे म्हणतात, "श्रीमंत माणसं कुठेपण जातात." वल्ली आणि मावशी या स्क्रीनवर जरी एकमेकांशी वाद घालत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांचं बॉण्डिंग खूपच चांगलं आहे आहे हे त्यांच्या ऑफस्क्रीन चाललेल्या धमाल मजा मस्ती वरून कळून येतं.