Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या या चित्रपटाला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ११ दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठला आहे.
१०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा रणबीर कपूरच्या करिअरमधील सहावा हिट चित्रपट ठरला आहे. याआधी २०२२मध्ये रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. याशिवाय रणबीरच्या ‘बर्फी’, ‘संजू’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटांनीही १०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
श्रद्धा आणि रणबीरचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने ३.५० कोटींचा बिझनेस केला. या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी ६ कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत चित्रपटाचे शनिवारचे कलेक्शन चांगले होते. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १०२.२१ कोटींची कमाई केली आहे.
‘तू झुठी मैं मक्कर' चे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. यापूर्वी त्याने ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारखे रोमँटिक कॉमेडी शैलीचे चित्रपट केले होते, जे पडद्यावर हिट ठरले होते. आता लव रंजनने रणबीर आणि श्रद्धाच्या या चित्रपटाच्याबाबतीतही असेच काहीसे केले आहे. रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.
संबंधित बातम्या