बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट होळी आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. या बॉलिवूड चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या आकड्यांवरूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे स्पष्ट झाले होते. आता चित्रपट कमाईच्या बाबतीत २०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये शामिल होणार असल्याचे दिसत आहे.
लव फिल्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चित्रपटाने वर्ल्ड वाइड २०१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच भारतात चित्रपटाने १६१ कोटी रुपये कमावले आहेत. ११ दिवसात चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता लवकरच चित्रपट २०० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘तू झुठी मैं मक्कर' चे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. यापूर्वी त्याने ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारखे रोमँटिक कॉमेडी शैलीचे चित्रपट केले होते, जे पडद्यावर हिट ठरले होते. आता लव रंजनने रणबीर आणि श्रद्धाच्या या चित्रपटाच्याबाबतीतही असेच काहीसे केले आहे. रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.
संबंधित बातम्या