Tu Chal Pudha: शिल्पीच्या हट्टापायी अश्विनी घरातून बाहेर पडणार! मालिका रंजक वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: शिल्पीच्या हट्टापायी अश्विनी घरातून बाहेर पडणार! मालिका रंजक वळणावर

Tu Chal Pudha: शिल्पीच्या हट्टापायी अश्विनी घरातून बाहेर पडणार! मालिका रंजक वळणावर

May 10, 2023 02:19 PM IST

Tu Chal Pudha Latest Episode: शिल्पीच्या हट्टामुळे आता घरातील लोकांची वाताहत होऊ नये म्हणून अश्विनी आणि श्रेयस घरातून बाहेर पडणार आहेत.

Tu Chal Pudha
Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode: तू चाल पुढं’ या लोकप्रिय मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळणार आहे. अखेर अश्विनीला आता बेघर व्हावं लागणार आहे. शिल्पीच्या हट्टापुढे आता अश्विनी आणि श्रेयस दोघेही नमतं घेतलं आहे. आपल्या वादात घरातल्या लोकांना होताना पाहणं अश्विनीला असहाय्य झालं आहे. अखेर तिने पती श्रेयस आणि आपल्या दोन्ही मुलींसह घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनीला हरवण्यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. पण, ती नेहमीच तोंडघडशी पडली. अश्विनी विरोधात सगळेच डाव अयशस्वी ठरल्यानंतर आता शिल्पीने तिच्या कुटुंबावर वार करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाघमारेंचं घर आपल्या नावावर करून श्रेयस आणि अश्विनीला घराबाहेर काढायचं हा डाव तिने आखला होता. मात्र, बाबांनी तसे करण्यास नकार दिला आहे. आपलं राहतं घर मी माझ्या दोन्ही मुलांच्या नावावर करणार असा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, संपूर्ण घर एकट्या शिल्पीच्या नावावर करण्यात यावं, असा हट्ट त्यांनी धरला होता. यावर जरी बाबांनी आक्षेप घेतला असला, तरी आईने आपला हट्ट लावून धरला आहे.

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहून बाळासाहेब थोरातांनी केलं कौतुक! केदार शिंदे म्हणतात...

आता आई उज्ज्वला यांचा हट्ट त्यांच्या जीवावर बेतला आहे. जोपर्यंत घर लेकीच्या नावे होत नाही, तोपर्यंत आपण अन्नपाणी ग्रहण करणार नाही, असा पण त्यांनी घेतला आहे. पोटात काहीच नसल्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या. मात्र, त्यांनी आपला हट्ट सोडला नाही.

एकीकडे आईचा हट्ट, तर दुसरीकडे बाबा देखील माघार घेत नसल्याने काय करावं असा प्रश्न श्रेयस आणि अश्विनी यांच्यासमोर उभा राहिला होता. अखेर अश्विनीने श्रेयसला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आता ते दोघे मिळून घरातून बाहेर पडणार असून, स्वतःचा मार्ग वेगळा करणार आहेत. मात्र, बाबांना त्यांचा हा निर्णय पटलेला नाही. तरीही शिल्पीच्या हट्टामुळे आता घरातील लोकांची वाताहत होऊ नये म्हणून अश्विनी आणि श्रेयस आता माघार घेणार नाहीयेत. आता मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner