मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Bhetashi Nvyane: प्रिया मराठे प्रेमासाठी रचणार षडयंत्र, 'तू भेटशी नव्याने’ मालिकेबाबात मोठी अपडेट

Tu Bhetashi Nvyane: प्रिया मराठे प्रेमासाठी रचणार षडयंत्र, 'तू भेटशी नव्याने’ मालिकेबाबात मोठी अपडेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 06, 2024 08:40 AM IST

Tu Bhetashi Nvyane Serial update: सुबोध भावे मुख्य भूमिकेत असणारी 'तू भेटशी नव्याने’ मालिका लवकरच सुरु होणार आहे. आता या मालिकेत सुबोधसोबत कोण दिसणार चला जाणून घेऊया...

Tu Bhetashi Nvyane: तू भेटशी नव्याने’ मालिकेबाबात मोठी अपडेट
Tu Bhetashi Nvyane: तू भेटशी नव्याने’ मालिकेबाबात मोठी अपडेट

सध्या मालिका विश्वात अनेक नवनव्या विषयावर मालिका भेटीला येत असल्याचे दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत असणारी मालिका 'तू भेटशी नव्याने’ ची जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. आता या मालिकेतविषयी अपडेट समोर आली आहे.

मालिकेत खलनायकाची एण्ट्री

'तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता मालिकेत खलनायकाची भूमिका अभिनेत्री प्रिया मराठी साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘रागिणी अग्निहोत्री’ असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते ? ते मालिकेत पहाता येणार आहे. रागिणीच्या येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार? गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार? हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण कसं खरं उतरणार? याची रंजक कथा मालिकेत पहायला मिळणार आहे.
वाचा: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करायला, त्यातही निगेटिव्ह रोल करायला प्रिया मराठे खूपच उत्सुक असून आपल्या या भूमिकेबद्दल प्रिया सांगते कि, जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.
वाचा: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं वाचा

ट्रेंडिंग न्यूज

कधी आणि कुठे पाहायला मिळणार मालिका

'तू भेटशी नव्याने’ ही मालिका ८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एआयवर आधारित मालिका असल्यामुळे सर्वांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता लागली आहे. 'तू भेटशी नव्याने’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता सुरु प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.
वाचा: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

WhatsApp channel