TRP Report Marathi Serial Week 33 Top 5 Marathi Serial: मराठी मालिकांचा ३३व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात मालिकांमध्ये अनेक वळणं पाहायला मिळाली आहेत. याचाच परिणाम टीआरपी रिपोर्टमध्ये देखील दिसला आहे. या आठवड्यात एक मालिकेने टीआरपी शर्यतीत आपली जागा निर्माण केली असून, जानकी आणि हृषिकेशची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता टॉप ५ मालिकांमधून बाहेर पडली आहे. चला तर मग जाणून घेऊया मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट...
‘ठरलं तर मग’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. या मालिकेने पुन्हा एकदा आपला पहिला नंबर कायम ठेवला आहे. या मालिकेला ३३व्या आठवड्यात ६.८चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत सध्या अतिशय सुंदर वळण पाहायला मिळत आहे. प्रतिमा आत्या घरी परतून आल्यामुळे आता सुभेदारांच्या घरात इतक्या वर्षांनी रक्षाबंधन जल्लोषात साजरं झालं आहे.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेने ३३व्या आठवड्यात जोरदार उसळी घेतली आहे. या मालिकेने चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या मालिकेला ६.५चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत सध्या मानसीच्या वडिलांचे धक्क्यामुळे निधन झाले आहे. तर, तेजस मानसीला या सगळ्यातून सावरायचा प्रयत्न करत आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने आपला तिसरा क्रमांक टिकवून ठेवला आहे. या मालिकेला ३३व्या आठवड्यात ६.४ टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत मंगळागौरीच्या पूजेदरम्यान कला आणि अद्वैत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळालं. या वादामुळे आजोबांना मोठा धक्का बसला. आजोबांची तब्येत बिघडल्याचे कळताच आता अद्वैत कलाशी चांगलं वागण्याचं नाटक करणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या वेगळंच वळण पाहायला मिळत आहे. सावनीने हर्षवर्धनशी लग्न तुटल्यानंतर आता मुक्ता आणि सागरच्या घरातच ठाण मांडलं आहे. मुलांची धमकी देऊन ती सागरशी लगट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता मुक्ता तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. या मालिकेला ६.३चा टीआरपी मिळाला असून, मालिका चौथ्या स्थानावर आहे.
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेने ३३व्या आठवड्यात टीआरपी शर्यतीत एन्ट्री घेतली आहे. या मालिकेचं कथानक आता प्रेक्षकांना आवडू लागलं आहे. या मालिकेत आता राया आणि मंजिरी यांची हळुवार फुलणारी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. राया मंजिरीला तिच्या प्रत्येक पावलावर साथ देताना दिसत आहे. या मालिकेला ५.७चा टीआरपी मिळाला असून, मालिका पाचव्या स्थानी आहे.