TRP Report: सायली, कला, मुक्ता की जानकी? ३०व्या आठवड्याच्या टीआरपी शर्यतीत कुणाच्या मालिकेने मारली बाजी?-trp report marathi serial week 30 top 5 marathi serial which serial won the trp race ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TRP Report: सायली, कला, मुक्ता की जानकी? ३०व्या आठवड्याच्या टीआरपी शर्यतीत कुणाच्या मालिकेने मारली बाजी?

TRP Report: सायली, कला, मुक्ता की जानकी? ३०व्या आठवड्याच्या टीआरपी शर्यतीत कुणाच्या मालिकेने मारली बाजी?

Aug 05, 2024 03:12 PM IST

TRP Report Marathi Serial Week 30: सध्या काही मालिका आपली जागा टिकवून राहिल्या आहेत. चला तर एक नजर टाकूया ३०व्या आठवड्यातील मराठी मालिकांच्या टीआरपी रिपोर्ट्सवर...

TRP Report Marathi Serial Week 30 Top 5 Marathi Serial
TRP Report Marathi Serial Week 30 Top 5 Marathi Serial

TRP Report Marathi Serial Week 30: मराठी मालिकांचं रिपोर्ट कार्ड म्हणजेच टीआरपीचे आकडे नुकतेच समोर आले आहेत. यातून कोणत्या मालिकांनी बाजी मारली हे समोर आले आहे. सध्या काही मालिका आपली जागा टिकवून राहिल्या आहेत. चला तर एक नजर टाकूया ३०व्या आठवड्यातील मराठी मालिकांच्या टीआरपी रिपोर्ट्सवर...

ठरलं तर मग

ठरलं तर मग' या मालिकेने आपला पहिला नंबर टिकवून ठेवला आहे. या मालिकेला ३०व्या आठवड्यात ६.९चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. या मालिकेत सध्या प्रतिमा आत्या पुन्हा सुभेदारांच्या घरात परतून आल्या आहेत. यामुळे काही लोक सुखावले आहेत. तर, काही लोक मात्र भीतीने पांढरे पडले आहेत. आता प्रतिमामुळे खोट्या तन्वीचं पितळ उघडं पडणार का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेला टीआरपीच्या शर्यतीत दुसरे स्थान मिळाले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका आपलं दुसरं स्थान टिकवून राहिली आहे. या मालिकेला ३०व्या आठवड्यात ६.८चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत सध्या कला दागिन्यांचे डिझाईन बनवण्याचे काम करतेय, हे अद्वैतच्या समोर आले आहे. तो कलाला काम करण्यापासून रोखणार आहे. मात्र, कला त्याच्या बोलण्याला जुमानणार नाही.

Navri Mile Hitlerla: विक्रांतचं खरं रूप समोर येणार; एजे लीलाच्या जीवाला निर्माण झालेला धोका टाळू शकणार?

प्रेमाची गोष्ट

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने देखील आपलं तिसरं स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेला ३०व्या आठवड्यात ६.५चा टीआरपी मिळाला असून, मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत सध्या मुक्ता आणि सागर यांच्यातील प्रेम बहरताना दिसत आहे. आता मुक्ता स्वतःच्या हाताने सागरसाठी मासे तळताना दिसणार आहे.

थोडं तुझं आणि थोडं माझं

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिके अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ३०व्या आठवड्यात ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका ६.४चा टीआरपी मिळवून चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेत आता मानसीचं लग्न लागताना दिसणार आहे. मात्र, या दरम्यान तेजसच्या आयुष्यात अनेक अडचणी येणार आहेत.

घरोघरी मातीच्या चुली

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका काहीशी खाली घसरली आहे. या मालिकेला ३०व्या आठवड्यात ५.९चा टीआरपी मिळाला असून, ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेत आता हृषिकेश आणि जानकीला नानांच्या पहिल्या लग्नाबद्दल कळणार आहे. यासोबतच हृषिकेशच्या जन्माचं सत्य देखील समोर येणार आहे.

विभाग