TRP Report: ‘ठरलं तर मग’ ते ‘घरोघरी मातीच्या चुली’; कोणत्या मराठी मालिकांनी मारली टीआरपीच्या ‘टॉप ५’मध्ये बाजी?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TRP Report: ‘ठरलं तर मग’ ते ‘घरोघरी मातीच्या चुली’; कोणत्या मराठी मालिकांनी मारली टीआरपीच्या ‘टॉप ५’मध्ये बाजी?

TRP Report: ‘ठरलं तर मग’ ते ‘घरोघरी मातीच्या चुली’; कोणत्या मराठी मालिकांनी मारली टीआरपीच्या ‘टॉप ५’मध्ये बाजी?

Published Jul 12, 2024 10:22 AM IST

TRP Report Marathi Serial: नुकताच २७व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या आठवड्यात कोणत्या मराठी मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये बाजी मारली आहे, जाणून घेऊया..

TRP Report Marathi Serial week 27
TRP Report Marathi Serial week 27

TRP Report Marathi Serial: मराठी मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिका दाखल झाल्या आहेत. तर, येत्या काही दिवसांत आणखी काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, कोणत्या मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत, हे मराठी मालिकांच्या टीआरपी रिपोर्टमधून समोर येत आहे. नुकताच २७व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या आठवड्यात कोणत्या मराठी मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये बाजी मारली आहे, जाणून घेऊया..

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ या मालिकेने २७व्या आठवड्यातही आपला पहिला नंबर टिकवून ठेवला आहे. २७व्या आठवड्यात ‘ठरलं तर मग’ या मालिकेने ६.९चा टीआरपी मिळवला आहे. या मालिकेत सध्या धमाल कथानक पाहायला मिळत आहे. पूर्णा आजीने सायलीला नातसून म्हणून स्वीकारून तिच्या हातात घराच्या किल्ल्या सुपूर्द केल्या आहेत. आता अर्जुन सायलीला मनातील भावना सांगण्यासाठी मधुभाऊंची केस लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने २७व्या आठवड्यात ६.६चा टीआरपी मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अद्वैत चांदेकर आणि कला यांच्यातील वाढती जवळीक आता प्रेक्षकांना आवडू लागली आहे. आता त्यांच्यात प्रेम फुलावे, असे सगळ्यांनाच वाटत आहे.

Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीच्या वरातीत हॉलिवूड सेलिब्रिटीही नाचणार! कोण कोण होणार सहभागी? वाचा...

प्रेमाची गोष्ट

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला २७व्या आठवड्यात ६.४चा टीआरपी मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेत सध्या सावनीचा लग्न सोहळा पाहायला मिळत आहे. या लग्नसोहळ्यातही सावनी मुक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या डावात आता आदित्य देखील सामील होणार आहे. मुक्ताने आपला हात भाजला, असा खोटा आरोप तो तिच्यावर करणार आहे.

थोडं तुझं आणि थोडं माझं

शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांच्या नव्याकोऱ्या जोडीची मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मलिकेला ६.४ टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत एक वेगळंच कथानक पाहायला मिळत आहे. एकीकडे मनमोकळेपणाने वावरणारी नायिका आहे. तर, दुसरीकडे वहिनीच्या जाचात अडकलेला नायक. या दोघांची प्रेमकथा हळूहळू फुलणार आहे.

घरोघरी मातीच्या चुली

घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका टीआरपी शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला ५.९चे टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे. मात्र, या दरम्यान आता त्यांच्या कुटुंबावर एक वेगळेच संकट कोसळणार आहे.

Whats_app_banner