सायली अर्जुनने पुन्हा मारली बाजी! ‘टॉप ५’ मध्ये कोणत्या मालिकांनी मिळवली जागा? पाहा टीआरपी यादी-trp list marathi serial week 13 top 5 marathi serial list here tharala tar mag is on top ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायली अर्जुनने पुन्हा मारली बाजी! ‘टॉप ५’ मध्ये कोणत्या मालिकांनी मिळवली जागा? पाहा टीआरपी यादी

सायली अर्जुनने पुन्हा मारली बाजी! ‘टॉप ५’ मध्ये कोणत्या मालिकांनी मिळवली जागा? पाहा टीआरपी यादी

Apr 08, 2024 10:43 AM IST

१३व्या आठवड्याच्या मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणत्या मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत, ते पाहायला मिळत आहे.

सायली अर्जुनने पुन्हा मारली बाजी! ‘टॉप ५’ मध्ये कोणत्या मालिकांनी मिळवली जागा? पाहा टीआरपी यादी
सायली अर्जुनने पुन्हा मारली बाजी! ‘टॉप ५’ मध्ये कोणत्या मालिकांनी मिळवली जागा? पाहा टीआरपी यादी

मराठी मालिका विश्वात सध्या मालिकांचा चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे. सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या असल्या तरी जुन्या मालिकांनी आपला प्रेक्षकवर्ग राखून ठेवला आहे. आता १३व्या आठवड्याच्या मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणत्या मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत, ते पाहायला मिळत आहे. चला तर, बघूया या आठवड्यात कोणत्या मराठी मालिकांनी बाजी मारलीये...

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या केसमधील पुरावे शोधण्यासाठी एकत्र प्रयत्न करणार आहेत. मात्र, त्याआधी गेल्या आठवड्यात या मालिकेत चांगला ड्रामा पाहायला मिळाला. अर्जुनशी जवळील साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाला सायलीने चांगलंच खडसावलं. तर, प्रियाची बाजू घेणाऱ्या पूर्णा आजीला देखील सायलीने चोख उत्तर दिलं. सायलीचा हा वेगळा अवतार पाहून अर्जुनच नाही, तर प्रेक्षकही खूप खुश झाले. या मालिकेने ६.९चा टीआरपी मिळवत पहिले स्थान कायम ठेवले आहे.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले...

प्रेमाची गोष्ट

तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांच्या जोडीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच आवडत आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान ‘मुक्ता’, तर राज हंचनाळेने ‘सागर’ ही भूमिका साकारली आहे. आता मुक्ता आणि सागर यांच्या नात्यांमध्ये काहीसा दुरावा आलेला पाहायला मिळत आहे. सागरचं हे दुसरे लग्न असलं, तरी मुक्ता सागरच्या मुलांवर आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम करत आहे. दुसरीकडे, आपल्या मुलाचा विश्वास संपादन करण्याच्या नादात सागरने आपण मुक्तावर खोटं प्रेम करत असल्याचं म्हटलं होतं, हे ऐकल्यानंतर मुक्ता चांगलीच दुखावली गेली होती. आता सागर पुन्हा एकदा सईची मदत घेऊन मुक्ताचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. या मालिकेने ६.४चा टीआरपी मिळवत, दुसरे स्थान पटकावला आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैत आणि कला राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी पुरावे शोधत आहे. आता कला आणि अद्वैत यात यशस्वी होतील का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याआधीच या कथानकात आणखी काही ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. या मालिकेने गेल्या आठवड्यात ६.४चा टीआरपी मिळवत, तिसरे स्थान पटकावले आहे.

कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा...

तुझेच मी गीत गात आहे

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता मंजुळा म्हणून मल्हारच्या घरात वावरत असलेली वैदही स्वतःचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी काही पुरावे देणार आहे. तर, पिहू ही मल्हारची मुलगी नसून, शुभंकरची मुलगी आहे हे आता सगळ्यांसमोर आले आहे. मोनिकाने देखील हे सत्य कबूल केले आहे. त्यामुळे आता शुभंकर आपल्या मुलीला मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, पिहू देखील शुभंकरला आपला वडील म्हणून स्वीकारणार आहे. या मालिकेने ६.३चा टीआरपी मिळवत चौथे स्थान पटकावले आहे.

घरोघरी मातीच्या चुली

नव्यानेच आलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. केवळ प्रेक्षकांच्या मनातच नाही, तर टीआरपीच्या शर्यतीत देखील या मालिकेने आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत सध्या सौमित्र आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. सुरुवातीला लग्नाला नकार देणाऱ्या सौमित्रने आता होकार देत ऐश्वर्याला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. मात्र इतकी वर्ष एकत्र असलेलं हे घर, गुण्यागोविंदाने नांदणारी इथली माणसं ऐश्वर्या घरात पाऊल टाकताच एकमेकांपासून दुरावू लागणार आहे. ऐश्वर्या असं काय करणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. या मालिकेने ६.१चा टीआरपी मिळवत पाचवे स्थान पटकावले आहे.

विभाग