दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. नुकताच जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तृप्ती हजेरी लावणार होती. पण काही कारणास्तव तिला जाते आले नाही. त्यामुळे जयपूरमधील महिला यांनी संताप व्यक्त केला आहे. खरं तर तृप्ती डिमरीला जयपूरमधील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. यासाठी तिने फीही घेतली होती, पण नंतर अभिनेत्री इव्हेंटमध्ये पोहोचली नाही. कार्यक्रमाला न पोहोचल्याने कार्यक्रमाशी संबंधित महिलांनी तृप्ती डिमरीच्या फोटोचा चेहरा काळा केल्याची चर्चा सुरु आहे.
खरं तर तृप्ती डिमरी फिक्की फ्लो संस्थेच्या महिला उद्योजकांच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार होती. या कार्यक्रमात स्त्रीशक्तीवर भर देण्यात आली आहे. तृप्ती डिमरी या कार्यक्रमात पोहोचणार होती, पण ती कार्यक्रमात पोहोचू शकली नाही, त्यामुळे ग्रुपशी संबंधित महिला अभिनेत्रीवर संतापल्या. तृप्तीचा आगामी चित्रपट विकी विद्याच्या व्हिडिओवर बहिष्कार टाकण्याची भूमिका ही त्यांनी घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती डिमरीने जयपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला सुरुवातीला होकार दिला होता. त्यासाठी तिने साडेपाच लाख रुपये मानधन घेतले. कार्यक्रमाशी संबंधित एका महिलेने सांगितले की, जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तिला सांगण्यात आले होते की तृप्ती पाच मिनिटांत तेथे पोहोचत आहे. परंतु ती कार्यक्रमात पोहोचली नाही. तृप्ती यांच्याविरोधात कायदेशीर मदत घेणार असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे. जयपूरने तृप्तीच्या चित्रपटावर बहिष्कार टाकावा, असेही त्या म्हणाल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये महिला रागाने बोलताना दिसत आहे की, "तिचे सिनेमे कोणीही पाहणार नाही. हे सेलेब्स वचन दिल्यानंतर इव्हेंटमध्ये येत नाहीत. तुम्ही कोण आहात? ही तर तितकी प्रसिद्ध सुद्धा नाही. ही अभिनेत्री कोण आहे पाहण्यासाठी खरं तर आम्ही आलो होतो. पण ही सेलिब्रिटी त्या लायक नाही."
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये या कार्यक्रमाचे आयोजक स्टेजवरील तृप्ती डिमरीच्या पोस्टरवर काळे फासताना दिसत आहेत. त्याचवेळी गर्दीत उभ्या असलेल्या स्त्रिया ओरडत आहेत, 'तिचा चेहरा काळा करा.' तसेच या कार्यक्रमासाठी तृप्तीला निम्मे पैसे देण्यात आले होते. त्यामुळे आता तिच्याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती देखील दिली आहे.