
Tripti Dimri Animal The Movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या 'अॅनिमल' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने रणबीर कपूर याच्यासोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. त्यांचे हे बोल्ड सीन्स सध्या खूपच चर्चेत आले आहेत. दोघांचे हे बोल्ड सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे तृप्तीला ट्रोल देखील केलं गेलं. मात्र, आता तृप्तीने तिच्या या इंटिमेट सीनचा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे.
तृप्ती डिमरी हिने हा प्रोजेक्ट स्वीकारला, तेव्हा निर्माते संदीप रेड्डी वंगा यांनी तिला या सीनबद्दल सांगितले होते. इतकंच नाही तर, हा इंटिमेट सीन शूट करताना रणबीर कापूरसह सेटवर उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच अभिनेत्रीची खूप काळजी घेतली होती. शूटिंगदरम्यान रणबीर आणि सेटवरील इतर लोक तिला सतत ती ठीक आहे का?, असे विचारत होते. 'अॅनिमल'मध्ये रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
या सीनबद्दल बोलताना तृप्ती डिमरी म्हणाली की, 'प्रोजेक्ट साइन करताना संदीपने मला आधीच सांगितले होते की, या चित्रपटात एक सीन आहे आणि मला तो अशा प्रकारे शूट करायचा आहे. पण, पडद्यावर तो अप्रतिम दिसणार आहे. त्याला 'ब्युटी अँड द बीस्ट' या प्रकारची प्रतिमा तयार करायची होती. त्याने तो सीन समजावून सांगितल्यानंतर पुढच्या गोष्टी माझ्यावर सोडल्या होत्या. हा सीन समजावल्यांनतर त्याने मला माझ्या कम्फर्टबद्दल विचारलं. मला योग्य वाटलं तरच हा सीन करू असं देखील म्हणाला. मी हा सीन नीट वाचला आणि लक्षात घेतला, तेव्हा मलाही हा सीन कमाल वाटला.'
पुढे तृप्ती डिमरी म्हणाली की, असा एखादा सीन करताना आपल्याला स्वतःला पूर्णपणे विसरून, त्या पात्रामध्ये शिरावे लागते. अशावेळी सेटवरच्या लोक आणि वातावरण देखील चांगलं लागतं. मी खूप लकी होते, बुलबुलचा रेप सीन असो वा आता 'अॅनिमल'चा सीन, माझ्या आजूबाजूला खूप चांगली टीम होती. त्यावेळी सेटवर पाच लोकांव्यतिरिक्त कुणालाही एंट्री नव्हती. सगळे मॉनिटर बंद करण्यात आले होते. प्रत्येक वेळी मला मी ठीक आहे का? असा प्रश्न ऐकू येत होता. स्वतः रणबीर कपूर देखील माझी काळजी घेऊन हा सीन करत होता.'
संबंधित बातम्या
