Zee Marathi Comedy Show: झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. गेल्या १० वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील चार कलाकारांना सोडून कुणालाही माहिती नव्हती. कार्यक्रमाच्या शुटिंगचा शेवटचा दिवस कोणता? याबाबत देखील माहिती नव्हती.
झी मराठी वाहिनीने 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम अचानकच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज १२ मार्च रोजी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या शुटिंगचा शेवटचा दिवस होता. पण झी मराठी वाहिनीने याबाबत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे या चार कलाकारांनाच कल्पना दिली होती. सेटवरील इतर विनोदवीर किंवा क्रू मेंबरला याबाबत जराही कल्पना नव्हती.
वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनण्यास बोनी कपूरचा नकार?
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे हे महत्त्वाचा भाग आहेत. पण त्यांच्याव्यतिरिक्त काहीशे मंडळी या कार्यक्रमात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. 'चला हवा येऊ द्या' अचानक बंद होणार असल्याने या सर्व कलाकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज थूकरटवाडीत शेवटच्या दिवसाचं शूटिंग पार पडणार आहे. 'चला हवा येऊ द्या' आता बंद होणार असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे 'होऊ दे व्हायरल', 'सेलिब्रिटी पॅटर्न', 'लहान तोंडी मोठा घास' असे पर्व आपण पाहिले आहेत. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांसाठी बम्पर गिफ्ट! १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय?
झी मराठीवर दोन नव्या मराठी मालिका सुरू होणार आहे. येत्या १८ मार्चपासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली. या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमिजा पाटील, सानिका काशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या