Mahabharat Kissa : पौराणिक कथांवर बनलेल्या टीव्ही मालिकांबद्दल बोलायचे झाले तर, बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारता’चा उल्लेख नक्कीच येतो. बीआर चोप्रा यांची महाभारत ही टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक मानली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन बीआर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. आता रवी चोप्राची पत्नी रेणू चोप्राने मालिकेच्या निर्मितीशी संबंधित माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा महाभारत निर्मितीच्या टप्प्यात होते, तेव्हा निर्मात्यांना दर आठवड्याला कोट्यवधींचे नुकसान होत असे.
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, रेणू चोप्रा यांनी सांगितले की, जी कंपनी तिला पहिल्या दोन-तीन भागांसाठी पैसे देत होती, ती कंपनी सहा लाख रुपये देत होती. आणि पहिल्या एपिसोडमध्येच जवळपास ७-८ लाख रुपये खर्च झाले. त्यानंतर रवी त्याच्या वडिलांकडे (बीआर चोप्रा) गेले आणि म्हणाला, 'मी ही मालिका बनवू शकत नाही, मी कितीही केले तरी ते सहा लाखांत एक भाग बनणार नाही'.
रेणू चोप्रा पुढे म्हणाली की, तेव्हा बीआर चोप्रा यांनी रवी यांना सांगितले की तू बनवत आहेस, तू खुश आहेस का? तर रवी म्हणाला- हो. यानंतर बीआर चोप्रा यांनी मुलाला सल्ला दिला, "तू मनापासून बनव, पैशांची काळजी करू नकोस, पैसे नंतर येतील." पैशांची अडचण असूनही निर्मात्यांनी ती मालिका बनवली.
रेणू चोप्रा पुढे म्हणाल्या की, "जेव्हा आम्ही ही मालिका बनवत होतो तेव्हा आम्हाला दर आठवड्याला दोन लाख रुपयांचे नुकसान होत असे. नंतर गोष्टी सुरळीत झाल्या. महाभारत आणि इतर गोष्टींमधून आम्हाला आर्थिक मदत मिळाली म्हणून आम्ही तिथे पोहोचू शकलो आहोत.'
संबंधित बातम्या