मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत पण…

बबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत पण…

Jun 17, 2024 08:42 AM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आता घराघरांत त्याच्या व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखले जातात. पण, दिलीप जोशी या आधीही अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत.

बबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत पण…
बबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत पण…

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध आहेत. काळाच्या ओघात या मालिकेच्या व्यक्तिरेखा साकारणारे बहुतांश कलाकार बदलले आहेत. पण प्रेक्षकांचे या मालिकेवरील प्रेम बदललेले नाही. हाथी भाईची स्टाईल असो किंवा तारक मेहताचं ज्ञान असो, टप्पूची मस्ती असो किंवा जेठालालची कॉमेडी , चाहत्यांमध्ये या मालिकेच्या प्रत्येक व्यक्तिरेखेची वेगळीच क्रेझ निर्माण झालेली दिसते. पण सर्वात जास्त फॅन फॉलोइंग जेठालाल आणि बबिता या जोडीची आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘जेठालाल’ या पत्राच्या पत्नीचे नाव ‘दयाबेन’ असले तरी, जेठालाल आणि बबिताजी यांची मैत्री सुरुवातीपासूनच खूप गाजली आहे. या जोडीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, या मालिकेच्या आधी ‘जेठालाल’ साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांनी एक असं पात्र साकारलं होतं, ज्यात ते ‘शकुंतला’चे दिवाने झालेले दिसले होते.

लग्नाआधीच होणाऱ्या सासू-सासऱ्यांना भेटायला गेली सोनाक्षी सिन्हा! फोटोनी वेधलं साऱ्याचं लक्ष

बबिताजींच्या आधी जेठालाल कोणावर झाले होते फिदा?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दिलीप जोशी ‘जेठालाल’च्या भूमिकेत, तर मुनमुन दत्ता बबिताजींच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील जेठालाल बबिताजींवर फिदा असतो आणि प्रत्येक वेळी तो तिला इम्प्रेस करण्यासाठी काही तरी करतो, तेव्हा प्रेक्षकांना पोट धरून हसायला नक्कीच मिळतं. पण बबिताजींच्या आधी जेठालाल कुणावर फिदा होते, हे तुम्हाला माहित आहे का? जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेआधी एका चित्रपटात दिसले होता. 'हम आपके हैं कौन' हा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता.

ट्रेंडिंग न्यूज

या चित्रपटात दिलीप जोशी ऊर्फ जेठालाल एका मुलीवर इतके फिदा झाले होते की, त्यात त्यांना शकुंतला दिसायची. आज दिलीप जोशी यांना जरी बहुतेक लोक जेठालाल म्हणून ओळखत असले तरी, सलमान खान स्टारर 'हम आपके है कौन' हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा बराच काळ दिलीप जोशी त्यांच्या चित्रपटातील पात्र ‘भोला प्रसाद’ या नावाने चाहत्यांना परिचित होते. चित्रपटात भोला प्रसाद नेहमी शकुंतला या मुलीचं स्वप्न पाहत असे. यांनतर दिलीप जोशी नवनवीन व्यक्तिरेखा आजमावत गेले आणि मग त्यांना जेठालालची व्यक्तिरेखा मिळाली. यावर आता अॅनिमेटेड सीरिजही तयार झाली आहे.

WhatsApp channel