Titeeksha Tawde Viral Video: छोट्या पडद्यावरची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा लग्न सोहळा काल म्हणजेच २६ फेब्रीवारी रोजी पार पडला आहे. आता त्यांच्या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातीलच एक व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओमध्ये लग्न लागताच तितीक्षा डोळ्यात पाणी आलेलं बघायला मिळालं आहे.
तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओंपैकी एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये लग्न लागताच आणि वरमाला गळ्यात पडताच तितीक्षा तावडे हिला भावनिक रडू कोसळलं आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून आता नेटकरी देखील भावनिक झाले आहेत. तिच्या आयुष्यात आलेला हा आसू आणि हसूचा हा क्षण आता सगळ्यांनाच आपापल्या आयुष्यातील खास क्षणाची आठवण आली आहे.
अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने आपल्या या सुंदर लग्न सोहळ्यासाठी अतिशय साधेपणाने सगळ्या गोष्टींची मांडणी केली होती. लग्नासाठी नेहमीचा ट्रेंड मोडून काढत तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी मोती रंगाचे आऊटफिट्स निवडले होते. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नातील व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्न सोहळ्याची खास झलक देखील बघायला मिळाली आहे. तितीक्षा व सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण या स्वप्नवत सोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेलं हे लग्न अगदी राजेशाही थाटात झालं होतं. सिद्धार्थ माडीवर उभा राहून तितीक्षाला मंडपात एन्ट्री करताना बघत असल्याचे, या व्हिडीओत दिसले आहे. तितीक्षाची नजर सिद्धार्थकडे जाताच तो तिला फ्लाइंग कीस देतो. त्याचा हा रोमँटिक अंदाज पाहून तितीक्षाला अश्रू अनावर होतात.
अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेत ‘नेत्रा’ बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर, सिद्धार्थ बोडके देखील त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.