क्राईम-थ्रिलर बघून कांटाळलात? पोट धरून हसायचंय? मग, बॉलिवूडचे ‘हे’ आयकॉनिक चित्रपट नक्कीच बघा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  क्राईम-थ्रिलर बघून कांटाळलात? पोट धरून हसायचंय? मग, बॉलिवूडचे ‘हे’ आयकॉनिक चित्रपट नक्कीच बघा!

क्राईम-थ्रिलर बघून कांटाळलात? पोट धरून हसायचंय? मग, बॉलिवूडचे ‘हे’ आयकॉनिक चित्रपट नक्कीच बघा!

Apr 18, 2024 10:38 PM IST

सध्या क्राईम-थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे. मात्र, हे सगळं बघून तुम्ही कांटाळला असाल आणि कॉमेडी चित्रपट बघण्याचा विचार करत असाल तर बॉलिवूडचे हे चित्रपट आवर्जून बघा.

क्राईम-थ्रिलर बघून कांटाळलात? पोट धरून हसायचंय? मग, बॉलिवूडचे ‘हे’ आयकॉनिक चित्रपट नक्कीच बघा!
क्राईम-थ्रिलर बघून कांटाळलात? पोट धरून हसायचंय? मग, बॉलिवूडचे ‘हे’ आयकॉनिक चित्रपट नक्कीच बघा!

सध्या क्राईम-थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे. नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या चित्रपटाची कथानकं एकसारखीच अॅक्शन-थ्रिलर जॉनरमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र, हे सगळं बघून तुम्ही कांटाळला असाल आणि कॉमेडी चित्रपट बघण्याचा विचार करत असाल, तर बॉलिवूडचे काही आयकॉनिक चित्रपट आवर्जून बघायलाच हवेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यातून प्रेक्षकांना कॉमेडीचा डबल डोस नक्कीच मिळतो. हे चित्रपट अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले असले, तरी आजही हे चित्रपट पाहून प्रेक्षकांना खळखळून हसायला येते.

अंदाज अपना अपना

१९९४साली प्रदर्शित झालेला 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट अशा निवडक बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे, जो तुम्ही कितीही वेळा पाहिला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. या चित्रपटात आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रवीना टंडन, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्या दमदार भूमिका आणि उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला आहे.

हेरा फेरी

२०००मध्ये रिलीज झालेला 'हेरा फेरी' हा कॉमेडी चित्रपट पाहून आजही चाहते मोठ्याने खळखळून हसतात. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि तब्बूसारखे दिग्गज कलाकार झळकले होते.

वेलकम

२००७मध्ये आलेल्या 'वेलकम' चित्रपटाचीही वेगळीच क्रेझ होती. या चित्रपटातील अनिल कपूर, नाना पाटेकर, अक्षय कुमार, कतरिना कैफ, परेश रावल आणि फिरोज खान यांची कॉमेडी प्रेक्षकांना भरपूर आवडली होती.

अभिराम लीलाची लग्न न करण्याची मागणी मान्य करणार? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

भागम भाग

२००६मध्ये रिलीज झालेल्या 'भागम भाग' चित्रपटात कॉमेडीचा ओव्हरडोस होता. हा चित्रपट पाहून प्रेक्षक भरपूर हसतात आणि आपली सगळी दुःख विसरून जातात. या चित्रपटातील अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल यांची कॉमेडी अप्रतिम होती.

हंगामा

विनोदाचा अप्रतिम नमुना असलेला हा चित्रपट २००३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी, परेश रावल, रिमी सेन, शक्ती कपूर आणि राजपाल यादव यासारखे कलाकार होते.

कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा

मुन्नाभाई एमबीबीएस

२००३मध्ये रिलीज झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट लोक अजूनही पुन्हा पुन्हा पाहतात. या चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदी आणि कॉमेडी उत्कृष्ट होती.

धमाल

२००७मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'धमाल' या कॉमेडी चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. संजय दत्त, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, असरानी, संजय मिश्रा आणि प्रेम चोप्रा यांनी चित्रपटात जबरदस्त कॉमेडी केली होती.

फुकरे

२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात पुलकित सम्राट, मनजोत सिंह, अली फजल, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चढ्ढा यांनी चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे.

Whats_app_banner