मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Timepass ३ Box Office Collection: प्रथमेश- ऋताच्या जोडीची जादू, किती आहे कमाई?

Timepass ३ Box Office Collection: प्रथमेश- ऋताच्या जोडीची जादू, किती आहे कमाई?

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 31, 2022 03:01 PM IST

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे यांची नवी कोरी जोडी 'टाइमपास ३' (box office collection of timepass 3 )मधून प्रेक्षकांच्या भेटीला अली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे.

टाइमपास ३
टाइमपास ३

'टाइमपास' फ्रॅन्चायजीचा 'टाइमपास ३'(timepass 3) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब (prathmesh parab) दगडूच्या भूमिकेत आहे. सोबतच अभिनेत्री ऋता दुर्गुळे (hruta durgule) मुख्य भूमिकेत आहे. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. काही प्रेक्षक चित्रपटाचं कौतुक करत आहेत तर काही चित्रपटात काहीच नाविण्य नसल्याचं म्हणत आहेत. मात्र यात अभिनेते संजय नार्वेकर यांची भूमिका प्रेक्षकांना तुफान पसंत पडते आहे. आता पर्यंत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कोटींचा आकडा पार केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १० हजार चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. कित्येक चित्रपटगृहात प्रेक्षकांची हजेरी केवळ १९ टक्के आहे. हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने मागच्या दोन दिवसात एक कोटीहून अधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ८० लाखांची मजल मारली आहे. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा १ कोटी १० कोटी आहे. त्यामुळे चित्रपटाने एकूण १ कोटी ९० लाखांची कमाई केली असल्याचं दिसतंय. या पुढे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा चित्रपट तब्बल १० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ होणं गरजेचं आहे.

या चित्रपटात भाऊ कदम, मनमीत पेम, वैभव मांगले, अन्विता फलटणकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

WhatsApp channel