Amitabh Bachchan Viral Post : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या चाहत्यांसोबत आपले विचार शेअर करताना दिसतात. पण, यावेळी बिग बींनी असे काही लिहिले आहे, जे वाचून त्यांच्या चाहत्यांच्या जीवाला घोर लागला आहे. अमिताभ बच्चन यांनी काल संध्याकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी लिहिले की, 'आता जाण्याची वेळ आली आहे'. अभिनेत्याची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहते त्यांना हे लिहिण्या मागचे कारण विचारत आहेत. काहींनी भावूक होत ‘असे बोलू नका’, असे म्हटले आहे. तर, तर काही जण बिग बींच्या कामाशी या वाक्याचा संबंध जोडत आहेत.
एका एक्स युजरने अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, ‘कुठे जायची वेळ आली आहे सर?' आणखी एका युजरने लिहिलं की, 'असं लिहू नका सर.' आणखी एका युजरने लिहिलं, ‘सरजी, तुम्ही हे काय लिहित आहात? याचा अर्थ काय आहे?’. आणखी एका युजरने लिहिलं की, 'सर, असं बोलू नका, तुम्ही सुपरहिरो आहात.' अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टमागचा अर्थ स्पष्ट न झाल्याने आता चाहत्यांची चिंता वाढली आहे.
काही चाहते म्हणत आहेत की, ‘दिवसभराच्या कामानंतर चाहत्यांना निरोप देताना त्यांनी हे म्हटले असावे का? शुभरात्री म्हणण्याची त्यांची ही पद्धत आहे!’ त्याच वेळी, काही चाहते असेही बोलत आहेत की, ‘बिग बी आता अभिनयाच्या जगातून निवृत्त होण्याचा विचार करत आहेत का? ते निवृत्तीचे संकेत तर देत नाहीयेत ना?’. सध्या, चाहते या पोस्टचा अर्थ जाणून घेण्यासाठी बिग बींच्या पुढील ट्विटची वाट पाहत आहेत.
५ फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांनी आपला मुलगा अभिषेक बच्चनच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे, ज्यात ते हॉस्पिटलच्या मॅटरनिटी वॉर्डमध्ये नुकत्याच जन्मलेल्या अभिषेककडे पाहताना दिसले होते. या फोटोत त्यांच्यासोबत काही नर्सही दिसत आहेत. अमिताभ हे मुलगा अभिषेकच्या खूप जवळ आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत आहेत. याशिवाय तो लवकरच 'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटात ते अश्वत्थामाची भूमिका साकारत आहे. तसेच, ते दीपिका पादुकोणसोबत 'द इंटर्न'च्या भारतीय रिमेकमध्ये देखील दिसणार आहेत.
संबंधित बातम्या