Tiku Talsania Hospitalised: टीव्ही आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता टीकू तलसानियाची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तापसणी केल्यावर टीकू यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
टीकू तलसानिया हे ७० वर्षांचे आहेत. अचानक त्यांना त्रास होऊ लागला. बेचैन झाल्यासारखे वाटू लागल्यामुळे पत्नीने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. चाहते टीकू यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत.
टीकू तलसानिया यांचा जन्म १९५४ साली झाला. १९८४ साली त्यांनी 'ये जो है जिंदगी' या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर १९८६ साली त्यांनी 'प्यार के दो पल' या बॉलिवूड सिनेमात काम केले. त्यांचा हा पहिला सिनेमा होता. त्यांनी आजवर अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा कॉमेडीचा टायमिंग हा प्रेक्षकांना विशेष आवडत असे. आता त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर अनेकांनी देवाकडे ते बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे.
वाचा: बिग बी- शाहरुख पेक्षा जास्त हिट सिनेमे, तरीही या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली नाही
एक से बढकर एक, हुकूम मेरे आका, गोलमाल है भाई सब गोलमाल है, प्रीतम प्यारे और वो, सजन रे झूठ मत बोलो या त्यांच्या गाजलेल्या मालिका. तसेच दिल है की मानता नाही, बोल राधा बोल, अंदाज अपना अपान, इश्क, देवदास, पार्टनर, धमाल, स्पेशल २६, सर्कस अशा अनेक चित्रपटांमध्ये ते दिसले. त्यांचा २०२४मध्ये विकी विद्या का वो वाला व्हिडीओ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजकुमार राव, तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत, विजय राज आणि अर्चना पूराण सिंह दिसले होते.
संबंधित बातम्या