Tiger 3 Offer: सलमान-कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'टायगर ३'च्या तिकिटावर मोठी ऑफर!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tiger 3 Offer: सलमान-कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'टायगर ३'च्या तिकिटावर मोठी ऑफर!

Tiger 3 Offer: सलमान-कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'टायगर ३'च्या तिकिटावर मोठी ऑफर!

Nov 27, 2023 10:12 AM IST

Tiger 3 Tickets Sale Offer: सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांना 'टायगर ३' पाहण्यासाठी खास ऑफर मिळणार आहे.

Tiger 3 Offer
Tiger 3 Offer

Tiger 3 Tickets Sale Offer: बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांचा 'टायगर ३' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 'टायगर ३' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता १४ दिवस उलटून गेले असले तरी हा चित्रपट आपलं स्थान टिकवून आहे. आता आणखी प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या दिशेने आपले पाय वाळवावेत म्हणून खास ऑफर ठेवण्यात आली आहे. नुकतीच ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. आता अर्ध्या किंमतीत प्रेक्षकांना 'टायगर ३' हा चित्रपट पाहता येणार आहे.

'टायगर ३' हा चित्रपट आता जगभरात ५०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. तर, भारतात देखील या चित्रपटाने २६५ कोटींची कमाई केली आहे. याच निमित्ताने आता मेकर्सनी प्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे. या आठवड्याच्या मधल्या दिवसांत सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांना 'टायगर ३' पाहण्यासाठी खास ऑफर मिळणार आहे. जर, तुम्ही देखील कतरीना आणि सलमान खान यांचे मोठे चाहते असाल, तर ही ऑफर अजिबात चुकवू नका. अवघ्या अर्ध्या किंमतीत आता तुम्हाला 'टायगर ३' मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत.

Bigg Boss 17: 'नवऱ्याला चपलेनं मारलंस आणि आता..'; विकी जैनची आई अंकितावर भडकली!

यशराज फिल्म्सने नुकतीच ही नवी ऑफर जाहीर केली आहे. सोमवार २७ नोव्हेंबर ते गुरुवार ३० नोव्हेंबर या कालावधीत हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत हा चित्रपट अवघ्या १५० रुपयांत पाहता येणार आहे. या ऑफरमुळे आता चाहत्यांना अर्ध्या किंमतीत हा चित्रपट पाहता येणार आहे. चाहते देखील ऑफर ऐकून आता आनंदी झाले आहेत.

'टायगर ३' या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार देखील झळकले आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.

Whats_app_banner