बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. सध्या ‘टायगर ३’चा बोलबाला सुरू असतानाच आता सलमानच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. या चित्रपटातील गाणे प्रदर्शित नवे गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यातील सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'टायगर ३' या चित्रपटातील 'लेके प्रभू का नाम' हे गाणे चर्चेत आहे. या गाण्याचा टीझर पाहिल्यापासून प्रेक्षकांमध्ये गाण्याबाबत उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता अखेर हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील कतरिना कैफचा लूक पाहण्यासारखा आहे. तसेच सलमानचा स्वॅग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: बिग बॉसच्या घरात 'वीकेंड का वार' होणार; 'हा' प्रसिद्ध चेहरा घरातून बाहेर जाणार!
"लेके प्रभु का नाम' हे गाणे मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर ३'मधील पहिले गाणे आहे. म्युझिक मेस्ट्रो प्रीतम यांनी हा उत्साही डान्स ट्रॅक तयार केला आहे ज्यामध्ये अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांचा आवाज आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गीत लिहिले आहे.
आता सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या या दमदार अभिनयाने चांगलेच वेड लावले आहे. या चित्रपटात अप्रतिम अॅक्शन सीक्वेन्सही पाहायला मिळणार आहेत. यावेळीही कतरिना आणि सलमानचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीला खिळवून ठेवले, अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.