Thukra Ke Mera Pyar Web Series : सध्या प्रेक्षकांचा कल ओटीटी विश्वाकडे वाढू लागला आहे. यातच काही वेब सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहेत. अशीच एक वेब सीरिज सध्या सगळीकडे ट्रेंड होताना दिसत आहे. 'ठुकरा के मेरा प्यार' असे या वेब सीरिजचे नाव असून, ही सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज बनली आहे. प्रेमावर आधारित असलेली ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. लोकांना ही वेब सीरिज इतकी आवडली आहे की, सगळेच तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत. चल जाणून घेऊया सीरिजबद्दल अधिक...
या वेब सीरिजची कथा अगदीच सोपी आहे. तुम्ही ही सीरिज पाहिलीत तर हे लगेच लक्षात येईल. या वेब सीरिजची सुरुवात एका गावातून होते, जिथे चौधरीची गुंडगिरी आहे.हा चौधरी त्याला वाटेल तसे करतो. चौधरीला एक मुलगी आहे, जी कॉलेजमध्ये शिकते, ती सायकल पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या गरीब मुलाच्या प्रेमात पडते.आणि ती हट्टाने त्या मुलाला तिचा बॉयफ्रेंड बनवते. यानंतर दोघेही एकमेकांना गुपचूप भेटत राहतात. पण, ही गोष्ट अचानक मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळते. आणि जेव्हा मुलीला विचारले जाते की, तिचे त्या मुलावर प्रेम आहे का, तेव्हा ती स्पष्टपणे नकार देते. त्यानंतर चौधरीचे संपूर्ण कुटुंब गरीब मुलाला, तसेच त्याच्या आई-वडिलांना आणि बहिणीला खूप मारते.
यानंतर, मुलगा कसा तरी आपला जीव वाचवतो आणि आपल्या कुटुंबासह दिल्लीला येतो. जिथे तो जीव तोड मेहनत करून अभ्यास करतो आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. यानंतर तो आयएएस बनतो, त्यानंतर तो त्याच्या गावात येतो जिथे त्याचे जुने घर होते. तिथे आल्यावर तो एका मंत्र्याच्या मुलीशी लग्न केले. ज्यानंतर आता त्याच्याकडे दुहेरी सत्ता आहे, त्यानंतर मुलगा आणि त्याचा सासरा, जो मंत्री आहे, दोघे मिळून चौधरीचा बदला घेतात. या दरम्यान तुम्हाला खूप ट्विस्ट आणि धमाल पाहायला मिळेल. जे पाहताना तुम्हाला एक भन्नाट अनुभव मिळेल. ही वेब सीरिज पाहताना तुम्हाला थोडासाही कंटाळा येणार नाही.
या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये मुलगा आणि मंत्री चौधरीकडून बदला घेतात. आता या सीरिजचा पुढचा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सीरिजचे पुढचे भाग दर आठवड्याला शुक्रवारी रिलीज होत आहेत. तुम्ही ही वेब सीरिज अजून पाहिली नसेल, तर तुम्ही ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघू शकता.