बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या यादीमध्ये नेहमीच अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांचे नाव घेतले जाते. ७० ते ८०च्या दशकात तिघांनीही बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले होते. पण या तिघांची मैत्री तेव्हा तुटली जेव्हा अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. या अफवांमुळे रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी १९८१ नंतर कधीही एकत्र काम केले नाही.
२००८ साली जया बच्चन यांना एका मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जर रेखासोबत काम केले तर तुम्हाला काही समस्या तर नाही ना? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जया यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?
जया बच्चन यांनी पीपल मॅगझिनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा एक व्हिडीओ रेडिटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाल्या की, 'नाही! मला का समस्या असेल? पण मला असे वाटते की दोघांनी एकत्र काम केले तर सगळीकडे जोरदार चर्चा सुरु होईल. याच गोष्टीमुळे खरं तर प्रेक्षकांनी त्यांना एकत्र पाहण्याची संधी गमावली आहे. दोघांनाही या गोष्टीची खूप आधीच जाणीव झाली होती. त्यांनी एकत्र काम केले असते तर चर्चांना आणखी जोर आला असता.'
वाचा: "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?
'सिलसिला' या चित्रपटात रेखा आणि जया यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटात अमिताभ बच्चन देखील होते. पण या चित्रपटानंतर ते कधीही एकत्र दिसले नाहीत. जया बच्चन आणि अमिताभ ही जोडी इंडस्ट्रीमधील सर्वात उत्तम जोडी म्हणून ओळखली जाते. त्यांनी १९७३ साली लग्न केले आणि तेव्हा पासून ते एकत्र राहात आहेत. लग्नाला ५१ वर्षे झाल्यानंतरही दोघेही आजही एकमेकांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असतात. जया यांनी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या बाँडविषयी व्यक्त केले होते. तसेच जया आणि अमिताभ बच्चन यांच्या जवळचे नेहमीच त्यांची प्रशंसा करताना दिसतात.
वाचा: 'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा