Viral Video: तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपरला झाली अटक, काय आहे प्रकरण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपरला झाली अटक, काय आहे प्रकरण?

Viral Video: तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपरला झाली अटक, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 11:46 AM IST

Rapper Killer Mike Arrested : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात असे काय झाले की रॅपरला अटक करण्यात आली? चला जाणून घेऊया..

Rapper Killer Mike Arrested
Rapper Killer Mike Arrested

Rapper Killer Mike Arrested video: जगभरतील संगीत प्रेमी ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात तो सोहळा म्हणजे 'ग्रॅमी पुरस्कार.' ४ फेब्रुवारी रोजी ग्रॅमी पुरस्कार २०२४ मोठ्या थाटामाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात रॅपर किलर माइकने तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले. हे पुरस्कार जिंकल्यानंतर माइकला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण असे नेमके काय झाले की माइकला अटक झाली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हॉलीवूड रिपोर्टर’ या वेबसाइटने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रॅपर किलर माइकने पुरस्कार जिंकल्यानंतर थोड्या वेळातच लॉस एंजेलिसयेथील पोलिसांनी क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथून अटक केल्याचे दिसत आहे. याबात पोलिस प्रवक्ते अधिकारी माइक लोपेझ यांनी माहिती दिली आहे. ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झालेल्या बाचाबाचीमुळे किलर माइकला अटक करण्यात आली. पहाटे चार वाजता त्याला अटक करण्यात आली आहे. माइकच्या अटकेबाबत त्याच्या टीमने याबाबतच्या ईमेल किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
वाचा: बॉबी देओलने भाचीच्या लग्नात केला 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स Video Viral

रॅपर किलर माइकला मिळाले तीन पुरस्कार

४८ वर्षीय किलर माइकला सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स, रॅप गाणं आणि रॅप अल्बमसाठी तीन ग्रॅमी पुरस्कार देण्यात आले. त्याचा पहिला पुरस्कार ‘सायंटिस्ट्स अँड इंजिनीअर्स’ या बेस्ट रॅप परफॉर्मन्ससाठी होता, याच गाण्याला बेस्ट रॅप साँगचा अवॉर्डही मिळाला. ‘मायकल’ हा त्याचा बेस्ट रॅप अल्बम होता. किलर माइकला शेवटचा ग्रॅमी पुरस्कार २००३ मध्ये ‘द होल वर्ल्ड’साठी मिळाला होता.

पुरस्कार जिंकल्यावर मानले चाहत्यांचे आभार

“तुमच्या वयावर मर्यादा घालणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमच्या वयाबद्दल किंवा तुम्ही काय करत आहात याबद्दल खरे न बोलणे. २० वर्षांचा असताना मला ड्रग डीलर बनणे चांगले वाटले होते. ४० व्या वर्षी मी केलेल्या गोष्टी आणि त्याच्या पश्चातापासह मी जगू लागलो. ४५ व्या वर्षी मी याबद्दल रॅप करण्यास सुरुवात केली. ४८ व्या वर्षी मी केलेल्या गोष्टींबद्दल सहानुभूतीने भरलेला माणूस म्हणून मी इथे उभा आहे” असे माइक म्हणाला. त्याच्या या बोलण्याने उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाले.

कोण आहे किलर माइक?

किलर माइक हा अमेरिकेतील अतिशय प्रसिद्ध रॅपर आहे. ४७ वर्षीय माइकने जवळपास दोन वर्षांपूर्वीच रॅप लिहिण्यास सुरुवात केली होती. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसाद मिळाला. त्याची ‘सायंटिस्ट्स अँड इंजिनीअर्स’,‘मायकल’, 'द होल वर्ल्ड’ ही गाणी तुफान हिट ठरली होती. यंदा ग्रामी पुरस्कारात त्याला या तीनही गाण्यांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये माइकविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Whats_app_banner