Bollywood Nostalgia : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष छाप पाडली आहे. यापैकी एक नाव म्हणजे कपूर कुटुंबाचे, ज्यांचे चित्रपट विश्वामध्ये योगदान अनेक दशकांपासून सुरू आहे. या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध स्टार राज कपूर होते, त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. अलीकडेच, राज कपूर यांची १००वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, ज्यात कपूर कुटुंबातील अनेक सदस्य आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी करीना कपूर, रणबीर कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट आणि नीतू कपूरसह अनेक प्रसिद्ध स्टार्स उपस्थित होते. मात्र, कपूर कुटुंबात एक असा सदस्य आहे ज्याने स्वत:ला फिल्मी जगापासून दूर केले आहे. कोण आहे हा सदस्य? चला जाणून घेऊया...
कपूर घराण्याचा मुलगा हा मुलगा बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्याऐवजी शिक्षक बनला आहे. हा मुलगा आहे अभिनेते शम्मी कपूर यांचा चिरंजीव आदित्य राज कपूर. आदित्य राज कपूर हे कपूर कुटुंबातील एकमेव सदस्य आहेत, ज्यांनी स्वतःला चित्रपटांपासून दूर ठेवून शिक्षण क्षेत्राची वाट निवडली आहे. कपूर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मनोरंजन विश्वाची वाट निवडली आहे. परंतु, आदित्य राज कपूर यांनी कधीही या मार्गावर न जाण्याचा निर्णय घेतला. आदित्य यांनी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले आणि वयाच्या ६७व्या वर्षी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतली आणि आपले स्वप्न पूर्ण केले.
शम्मी कपूर आणि गीता बाली यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांची सुरुवातीच्या काळात चांगली फिल्मी कारकीर्द होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काका राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी 'धरम करम' आणि 'सत्यम शिवम सुंदरम' सारख्या चित्रपटातही काम केले. मात्र, चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्याऐवजी त्यांनी काही काळानंतर व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. आदित्य राज कपूरने २०१०मध्ये पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि 'चेस' चित्रपटात काम केले. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी 'एव्हरेस्ट' या टीव्ही शोमध्येही काम केले. मात्र, चित्रपट आणि टीव्ही शोनंतर आदित्य यांनी पुन्हा स्वतःला चित्रपटांपासून दूर केले.
आता आदित्य राज कपूर शिक्षक म्हणून आयुष्य जगत आहे. हे पाऊल केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोठा बदल होता. कपूर कुटुंबातील इतर सदस्य चित्रपटसृष्टीत योगदान देत असताना, आदित्य यांनी स्वतःचा मार्ग निवडला.
संबंधित बातम्या