करण जोहरला आवडतो शाहरुख खान, काजोलच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातला ‘तो’ सीन! तुम्ही पाहिलाय का?-this scene featuring shah rukh khan kajol is karan johar s favourite watch ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  करण जोहरला आवडतो शाहरुख खान, काजोलच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातला ‘तो’ सीन! तुम्ही पाहिलाय का?

करण जोहरला आवडतो शाहरुख खान, काजोलच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातला ‘तो’ सीन! तुम्ही पाहिलाय का?

Sep 12, 2024 07:43 PM IST

Karan Johar: करण जोहरने इन्स्टाग्रामवर ‘माय नेम इज खान’ चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या आहेत, ज्यात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले होते.

Shah Rukh Khan and Kajol in a still from Karan Johar's My Name Is Khan.
Shah Rukh Khan and Kajol in a still from Karan Johar's My Name Is Khan.

Karan Johar Share Memories Of My Name Is Khan: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहे. परंतु, एका चित्रपटातील एक सीन त्याचा अतिशय आवडता आहे. करण जोहरने २०१०मध्ये शाहरुख खान, काजोल अभिनीत ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या कारकिर्दीतील आपला आवडता सीन कोणता आहे, याचा खुलासा केला आहे. 

करण जोहरचा आवडता सीन कोणता?

करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील एक भावनिक क्लिप शेअर केली आहे. यासोबत त्याने लिहिले की, ‘जेव्हा मी माझ्या कारकिर्दीवर विचार करतो, तेव्हा शाहरुख आणि काजोलचा हॉस्पिटलमधील सीन माझ्या डोळ्यांसमोर येतो.’

करणने लिहिले की, ‘मी २६ वर्षांपासून चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहे. मी माझ्या दिग्दर्शन कारकिर्दीकडे गोड आठवणी म्हणून पाहतो... मी माझ्या अपयशावर चिंतन नेहमी करतो... जादुई क्षण घडवणारे ते सुखद अपघात... पण हा सीन आणि यात शाहरुख आणि काजोल यांनी ज्या प्रकारे अतिशय सुंदररित्या अभिनय केला, तो माझ्या कारकिर्दीतील आवडता दिग्दर्शित सीन आणि क्षण राहील.’

त्याने शेअर केलेल्या क्लिपमध्ये शाहरुखची व्यक्तिरेखा रिझवान त्याची पत्नी मंदिरा राठोड खानला एका मेडिकल कंडीशनबद्दल समजावून सांगत असतो. पण, जेव्हा ती त्याला आपला मुलगा समीर मरण पावल्याचे सांगते, तेव्हा तो काय घडले ते समजून प्रार्थना करण्यास सुरुवात करतो.

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

चित्रपटाच्या चाहत्यांनी आणि मुख्य कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत हा त्यांचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' असल्याचे म्हटले आहे. शाहरुख आणि काजोलचा आजवरचा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे सगळेच म्हणत आहेत. ‘जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मी लहान होतो आणि मला प्रामाणिकपणे ते पटले नाही, परंतु आज या समाजात राहणारी ३२ वर्षांची मुलगी हा चित्रपट इतक्या खोलवर अनुभवू शकते’, असे एका चाहत्याने लिहिले आहे.

आणखी एकाने करण जोहरचे कौतुक करताना म्हटले की, 'मिस्टर जोहर, तुम्ही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहात, ज्यांनी आमच्यासाठी आठवणी निर्माण केल्या, आम्हा शाहरुख काजोलच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय असे चित्रपट बनवले. 'माय नेम इज खान' हा चित्रपट आणि अर्थातच शाहरुख खानची खास व्यक्तिरेखा आणि अप्रतिम अभिनय, त्याबद्दल धन्यवाद.' काही चाहत्यांनी चित्रपटातील त्यांच्या आवडत्या सीनवर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. 

माय नेम इज खान चित्रपटाबद्दल…

‘माय नेम इज खान’मध्ये एस्पर्गर सिंड्रोम असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीची काल्पनिक कथा मांडण्यात आली आहे, जो आपल्या दत्तक मुलाच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी अमेरिकेत जातो. २००१ मध्ये ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मुस्लिमांना भेडसावणाऱ्या इस्लामोफोबिया आणि भेदभावाची माहिती या चित्रपटात देण्यात आली आहे.

Whats_app_banner