‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

May 16, 2024 03:05 PM IST

‘लापता लेडीज’ची ‘मंजू माई’ आता कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये सहभागी होणार आहे. खुद्द अभिनेत्रीने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!
‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

काही दिवसांपूर्वी'लपता लेडीज'हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘लापता लेडीज’ हा चित्रपट जितका साधा होता, तितकंच त्याचं कथानकही मनाला भावणारं होतं. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. मात्र,या चित्रपटातील एक व्यक्तिरेखा अजूनही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘लापता लेडीज’मधील ही व्यक्तिरेखा आहे'मंजू माई'अर्थात अभिनेत्री छाया कदम. ‘लापता लेडीज’ची हीच ‘मंजू माई’ आता कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये सहभागी होणार आहे. खुद्द अभिनेत्रीने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यानंतर आता चाहते अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत.

अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे,ज्याच्या कॅप्शनमध्ये'चला कान्सला जाऊया'असे लिहिले आहे. अभिनेत्रीचा हा फोटो विमानतळावरील आहे. छाया कदमची ही पोस्ट पाहून चाहते चांगलेच आतुर झाले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की,‘हा खूप चांगला काळ आहे.’ दुसऱ्याने लिहिले,‘व्वा,काय कमाल आहे.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘खूप अभिनंदन.’ या पोस्टवर यूजर्स अशा कमेंट करताना दिसत आहेत.

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये का सहभागी होत आहे छाया कदम?

अभिनेत्री छाया कदम २०२४च्या कान फिल्म फेस्टिव्हलचा भाग होण्यासाठी सज्ज झाली आहे. छाया, पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’च्या प्रीमियरसाठी ७७व्या कान चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहे. त्यांचा हा चित्रपट जो मुख्य स्पर्धेचा एक भाग असणार आहे. तर, छाया कदम फिल्म फेस्टिव्हलचे साइडबार सेक्शन डायरेक्टरमधील फोर्टनाइटमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सिस्टर मिडनाईट’चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. याबद्दल बोलताना छाया म्हणाली की, ‘मी यासाठी खूप आनंदी आहे आणि माझ्या आयुष्यातील हा एक सुंदर क्षण आहे आणि पुढे काय होईल याचा जास्त विचार न करता मी त्याचा आनंद घेत आहे.’

'मंजू माई'ने जिंकली चाहत्यांची मनं

छाया कदमने'लापता लेडीज'या चित्रपटातून अवघ्या जगाला आपले अभिनय कौशल्य दाखवले असून, या चित्रपटात तिने'मंजू माई'बनून लोकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री छाया कदमच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर,अभिनेत्री १२वीमध्ये नापास झाली होती. परंतु त्यानंतरही तिने राज्य स्तरावर कबड्डी खेळून आपले नाव गाजवले. पुढे तिने टेक्सटाईल डिझाइनमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर तिने मराठी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट गाजवले. प्रत्येक गोष्टीत नेहमीच पुढे राहणारी छाया आज सोशल मीडियावर'मंजू माई'या नावाने लोकप्रिय झाली आहे.

Whats_app_banner