बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली असून, स्वतःचे वजन देखील कमी केले होते. लवकरच रिलीज होणाऱ्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील काही कलाकारांचे लूक समोर आले आहेत. आता या चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा लूक नुकताच समोर आला आहे. मराठी आणि हिंदी विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेता सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटामध्ये सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली आहे. त्यांचा लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या टीमने या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच शेअर केले होते. या पोस्टरवर सुभाष चंद्र बोस यांच्या लूकची झलक पाहायला मिळाली. या पोस्टरवर अभिनेते सचिन पिळगावकर सुभाष चंद्र बोस यांच्या भूमिकेत दिसले आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा भूमिकेतील त्यांचा लूक पाहून हे सचिन पिळगावकर आहेत हे ओळखूच येत नाहीये. सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या ‘सुभाषचंद्र बोस’ या पात्राची झलक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील दिसली होती. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी या भूमिकेसाठी इतकी मेहनत घेऊन आपला लूक बदलला आहे की, ते चक्क ओळखू देखील येत नाहीयेत. अगदी ट्रेलरमध्ये देखील कुणालाही हे लक्षात आलं नाही की, ते सचिन पिळगावकर आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट उद्या म्हणजेच २२ मार्चला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘स्वतंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारत आहे. यासोबतच या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. रणदीप हुड्डा याच्यासोबत अंकिता लोखंडे, अमित सियाल, सचिन पिळगावकर असे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणदी हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली असून, त्यासाठी त्याने अगदी स्वतःची दिनश्चर्येत देखील बदल केला होता.
या चित्रपटासाठी अभिनेता रणदीप हुड्डा याने ३० किलो वजन कमी केल्याचे बोलले जात आहे. रणदीप हुड्डा या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील असून, त्याने यात मुख्य भूमिका साकारली आहे. अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंग आणि अमित सियाल या कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. रणदीप हुड्डाचा हा चित्रपट २२ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.