मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscars 2024: 'ही' भारतीय डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत, काय आहे विषय?

Oscars 2024: 'ही' भारतीय डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत, काय आहे विषय?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 24, 2024 01:15 PM IST

Oscar 2024 nomination: यंदाचा ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी नामांकन समोर आले आहे.

to kill the tiger
to kill the tiger

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९६व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. त्यापूर्वी कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे याची यादी समोर आली. या यादीमध्ये भारतीय डॉक्यूमेंट्रीने देखील बाजी मारली आहे. आता ही डॉक्यूमेंट्री कोणती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

यंदा ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातील सत्य घटनेवर आधारित 'टू किल अ टायगर' या डॉक्यूमेंट्रीला नामांकन मिळाले आहे. ही डॉक्यूमेंट्री सत्य घटनेवर आधारित आहे. न्यायासाठी व्यवस्थेशी लढणाऱ्या रणजीतच्या आयुष्यावर आधारित ही डॉक्यूमेंट्री आहे. रणजीतच्या मुलीवर तीन पुरुषांनी लैंगिक अत्याचार केलेले अशतात. त्यामुळे तिला न्याय मिळून देण्यासाठी सुरु असलेला त्याचा खडतर प्रवास दाखवण्यात आला आहे.
वाचा: "मेरी कहानी का हर पन्ना खून से लिखा था", अंगावर शहारे आणणारा आर्या ३चा ट्रेलर रिलिज

'टू किल अ टायगर' या ड्रॉक्यूमेंट्रीची निर्मिती कॉर्नेलिया प्रिंसिपे आणि डेव्हिड ओपेनहाइम यांनी केली आहे. तसेच दिग्दर्शन दिल्लीमध्ये राहणाऱ्या निशा पाहुजा यांनी केले आहे. या माहितीपटाशिवाय बॉबी वाइन: द पीपल्स प्रेसिडेंट, द इटरनल मेमरी, फोर डॉटर्स अँड २० डेज इन मारियुपोल यांनाही सर्वोत्कृष्ट माहितीपटात नामांकन मिळाले आहे.

टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील बाजी

'टू किल अ टायगर' या डॉक्यूमेंट्रीच्या दिग्दर्शिका निशा या सध्या टोरंटोमध्ये वास्तवास आहेत. त्यांनी त्यांची ही डॉक्यूमेंट्री टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२मध्ये दाखवली होती. त्यासाठी सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फीचर चित्रपटासाठी अॅम्प्लीफाई व्हॉईस पुरस्कार जिंकला होता.

WhatsApp channel

विभाग