तीन वर्षांत तब्बल १४ वेळा प्रेग्नंट राहिली होती ‘ही’ अभिनेत्री; पण मूल जन्माला घालूच शकली नाही!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तीन वर्षांत तब्बल १४ वेळा प्रेग्नंट राहिली होती ‘ही’ अभिनेत्री; पण मूल जन्माला घालूच शकली नाही!

तीन वर्षांत तब्बल १४ वेळा प्रेग्नंट राहिली होती ‘ही’ अभिनेत्री; पण मूल जन्माला घालूच शकली नाही!

Oct 25, 2024 10:24 AM IST

अभिनेता कृष्णा आणि अभिनेत्री कश्मीरा लग्नाच्या ३ वर्षानंतर मे २०१७मध्ये जुळ्या मुलांचे आई-वडील बनले. सरोगसीद्वारे मुलांचा जन्म झाला. अनेकदा प्रयत्न करूनही अभिनेत्री स्वतः मूल जन्माला घालू शकली नाही.

Kashmera Shah And Krishna
Kashmera Shah And Krishna

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्याशी निगडीत ही कहाणी खूपच थक्क करणारी आहे. खरं तर पहिलं लग्न तुटल्यानंतर, सहा वर्षांनी या अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर काही महिन्यांनी अभिनेत्रीने आई होण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण, तिची गर्भधारणा सफल होऊ शकली नाही. आई होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने चित्रपटांपासून स्वतःला दूर केले होते. तिने तब्बल तीन वर्षे सतत गरोदर राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ती अपयशी ठरली. इतक्या वेळा प्रयत्न केल्यानंतर कंटाळून त्यांना अखेर आयव्हीएफचा आधार घ्यावा लागला.

कोण आहे ही अभिनेत्री?

कश्मीरा शाह असं या अभिनेत्रीचं नाव आहे. बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काश्मीराने २०१३मध्ये कृष्णा अभिषेकसोबत लग्न केले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच काश्मीराने गर्भधारणेचा प्रयत्न केला, पण तीन वर्षांत तिची प्रेग्नन्सी १४ वेळा अपयशी ठरली. इतकंच नाही तर, सततच्या गर्भपातामुळे तिची तब्येतही बिघडू लागली आणि तिचे वजन वाढू लागले. 

Viral Video : गाय बनून आलेल्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत का? हॅलोवीन पार्टीतील व्हिडीओमुळे होतोय ट्रोल!

त्या वेदनादायक काळाची आठवण सांगताना काश्मीराने ईटाइम्सला सांगितले होते की, ‘जेव्हा लोकांना कळले की, आम्ही आयव्हीएफच्या माध्यमातून मुले जन्माला घालण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा त्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. ते म्हणू लागले, की फिगर सांभाळण्यासाठी ती स्वतः मूल जन्माला घालत नाहीये. पण, त्यांना माहित नाही की, मी गरोदर राहण्यासाठी त्या तीन वर्षांत सर्व काही प्रयत्न केले. माझ्या मुलांना जन्म देणाऱ्या आणि खूप त्रास सहन करणाऱ्या सरोगेट मदरचे मी मनापासून आभार मानू इच्छिते.’

आधीच विवाहित असताना पडली प्रेमात!

कश्मीरा ही गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकची पत्नी आहे. दोघांची प्रेमकहाणी २००५मध्ये सुरू झाली. 'और पप्पू पास हो गया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये ते पहिल्यांदा भेटले होते. चित्रपट निर्माते ब्रॅड लिस्टरमनशी आधीच विवाहित केलेल्या कश्मीरा पहिल्याच नजरेत कृष्णावर प्रेम बसले. जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मुंबईत येऊन एकमेकांना भेटल्यानंतर त्यांचे नाते मीडियाच्या प्रकाशझोतात आले. २००७मध्ये काश्मिराने ब्रॅड लिस्टरमनला घटस्फोट दिला, तेव्हा त्यांच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. याला कृष्णा कारणीभूत आहे, असे सर्वांना वाटले. मात्र, कश्मीरा हे नाते तुटण्यामागे वेगळेच कारण असल्याचे म्हटले. बरीच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कश्मीरा आणि कृष्णा यांनी २०१३ मध्ये लग्न केले होते.

Whats_app_banner