Elvish Yadav Podhcast with Nyra Banerjee : प्रसिद्ध युट्युबरआणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवने त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. एल्विशने आता स्वतःचे पॉडकास्ट सुरू केले आहे,जे तो होस्ट करणार आहे. एल्विशच्या या शोची पहिली पाहुणी ‘बिग बॉस १८’ची स्पर्धक नायरा बॅनर्जी असणार आहे, जिला एल्विशने असे प्रश्न विचारले की, ते ऐकून तुमचं डोकंही चक्रावेल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया...
एल्विश यादवच्या या नव्या पॉडकास्टचे नाव आहे-'पॉडकास्ट विथ एल्विश'.या पॉडकास्टमध्ये एल्विश आपल्या पाहुण्यांना असे प्रश्न विचारणार आहे की, समोर बसलेला स्पर्धक पाहुणा रागाने लालबुंद नक्कीच होईल. त्याच्या नेहमीच्या शैलीत,एल्विश त्याच्या पाहुण्याला रोस्ट करणार आहे. त्याचा हा पॉडकास्ट दर गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता येईल. यावेळी,एल्विश यादवची पहिली पाहुणी ‘बिग बॉस १८’ची माजी स्पर्धक नायरा बॅनर्जी आहे,जिला एल्विश खूप बोल्ड आणि धारदार प्रश्न विचारताना दिसला आहे.
एल्विशच्या पहिल्या पॉडकास्टचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये एल्विश नायरा बॅनर्जीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. सर्वप्रथम,एल्विश नायराला विचारतो की, तिला बंगाली जादू माहित आहे,तरीही तिला इतक्या लवकर बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर एल्विश नायराला सांगतो की, ‘तुझ्या मॅनेजरने मला तुला भेटण्यापासून रोखले,तो म्हणाला की मॅडम सध्या वन नाईट स्टँडमध्ये व्यस्त आहेत.’ एल्विशचा हा प्रश्न ऐकून नायराच्या चेहऱ्यावर धक्कादायक भाव उमटले. यानंतर,एल्विश तिला विचारतो की, ‘तू सनी लिओनीकडून काही शिकली नाहीस का?’
या पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये,एल्विशने दावा केला आहे की त्याचे पाहुणे या शोमध्ये खूप संतापणार आहेत आणि तो त्यांच्या प्रश्नांनी आगीत तेल ओतण्याचे काम करणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये,एल्विश नायराला विचारतो की, ‘इंस्टाग्रामवर तुझे ६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि तुम्हाला साधी १५० मते देखील मिळाली नाहीत. हे तुझे सगळे नाईट फॉलोअर्स आहे का?’