मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय? ठिपक्यांची रांगोळीत नवे वळण
ठिपक्यांची रांगोळी
ठिपक्यांची रांगोळी (HT)
24 June 2022, 15:16 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 15:16 IST
  • अभिनेत्री वीणा जगपात अवंतिकाच्या भूमिकेत दिसत आहे.

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी.

ट्रेंडिंग न्यूज

प्रेमविवाह केला म्हणून अवंतिकाला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप अवंतिकाची भूमिका साकारत असून हे पात्र साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका. मात्र पहिल्याच दिवशी सेटवर तिची सर्वांसोबतच छान मैत्री झालीय. कानेटकर कुटुंबाची मी चाहती होतेच; या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशी भावना वीणाने व्यक्त केली. अवंतिका या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना ती म्हणाली, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे. उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी. अवंतिका हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी मिळतं जुळतं आहे असं मला वाटतं. जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळी होणारी अशी अवंतिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग