आज सिद्धार्थ शुक्ला यांची पहिली पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी पाठच्या वर्षी सिद्धार्थ आपल्या सर्वांना सोडून निघून गेला. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता कारण इतक्या लहान वयातच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. सिद्धार्थची खास गोष्ट म्हणजे तो खूप दयाळू अभिनेता होता आणि याच कारणामुळे चाहत्यांनाही तो खूप आवडायचा. जिवंत असतानाही सिद्धार्थने अनेकांचे भले केले, पण गेल्यावरही त्याने चांगले काम करायला विसरला नाही असं म्हणू शकतो. सिद्धार्थची मालमत्ता धर्मादाय संस्थेला देण्यात आली. तसे, सिद्धार्थ व्यतिरिक्त, मृत्यूनंतर इतर अनेक सेलिब्रिटींच्या मालमत्ता चॅरिटीला देण्यात आल्या.
सिद्धार्थ शुक्ला
सिद्धार्थ शुक्ला हा टीव्हीवरील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होता. त्याचे अनेक चाहते होते. सिद्धार्थ जिवंत असताना तो खूप दानधर्म करायचा आणि गेल्यावरही त्याच्या नावावर पुष्कळ दानधर्म करण्यात आलं. २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले. वृत्तानुसार, अभिनेत्याच्या मृत्यूपत्रात असे लिहिले होते की तो आपली संपत्ती धर्मादाय करणार आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. सिद्धार्थची एकूण संपत्ती ५० कोटी होती.
सुशांत सिंग राजपूत
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ आजही उलगडलेले नाही. सुशांतच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला. आजही सुशांतचे चाहते सोशल मीडियावर अभिनेत्याशी संबंधित आठवणी शेअर करत असतात. रिपोर्ट्सनुसार, सुशांतच्या कुटुंबीयांनी ठरवलं होतं की ते सुशांतची संपत्ती चॅरिटीला दान करतील. इतकंच नाही तर सुशांतच्या पाटण्यातील घराचं स्मारक बनवण्याचा निर्णयही त्याने घेतला होता, जिथे त्याच्याशी संबंधित गोष्टी ठेवल्या जातील, ज्यामध्ये त्याची पुस्तके, दुर्बिणीसारख्या गोष्टींचा समावेश असेल.
इरफान खान
बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या इरफान खानने २०२० मध्ये कर्करोगाशी लढा गमावला. इरफानच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने अभिनेत्याच्या मालमत्तेतील मोठा हिस्सा चॅरिटीसाठी दान करणार असल्याचे जाहीर केले होते. वृत्तानुसार, ६०० कोटींची देणगी धर्मादायतेसाठी देण्यात आली आहे. ६०० कोटींबाबत कुटुंबाने कधीही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
लता मंगेशकर
लता मंगेशकर यांनी गेल्या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी हे जग सोडले. रिपोर्ट्सनुसार, लतादीदींनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले होते की, त्यांची संपत्ती धर्मादाय संस्थेला दान करावी. त्यांच्या एकूण संपत्तीच्या अहवालानुसार ५०० कोटी आहे.
श्रीदेवी
२४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिचे पती बोनी कपूर यांनी तिच्या नावावर चॅरिटीसाठी मोठी रक्कम दिली होती. रिपोर्ट्सनुसार, बोनीने एका गावात अभिनेत्रीच्या नावावर एक छोटी शाळाही बांधली आहे जिथे मोफत शिक्षण दिले जाते.
संबंधित बातम्या