Abhishek Bachchan Viral Post : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार करत आहेत. यापूर्वी शूजित सरकार यांनी अभिषेकचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पा' दिग्दर्शित केला आहे. चला, तर वेळ न दवडता जाणून घेऊया हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे.
अभिषेकने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सांगण्यासारखे बरेच काही आहे, परंतु एक फोटो हजार शब्द बोलतो. #IWantToTalk २२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.’
अभिषेक बच्चनने काही वेळापूर्वी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्याचा एक फोटो आहे, जो एका खोलीत काढला गेला आहे. या फोटोमध्ये, तो लांब कोर्टसह शॉर्ट्समध्ये दिसत आहे. अभिषेकचे वजनही खूप वाढलेले दिसत आहे, तर त्याचे पोट देखील बाहेर आले आहे. त्याचा हा लूक अगदी वेगळाच आहे.
श्वेता बच्चन नंदा, झोया अख्तर, सोनाली बेंद्रे यांसारख्या सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिषेक बच्चन याच्या या सिनेमासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. अभिषेक बच्चनचा अभिनय आणि शूजित सरकारचं दिग्दर्शन... हे कमाल कॉम्बिनेशन आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच चित्रपट गृहात जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बऱ्याच काळानंतर अभिषेक बच्चन पुन्हा एकदा धमाकेदार भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
बॉक्स ऑफिसवर अभिषेक बच्चनचा हा चित्रपट आणखी चार चित्रपटांशी भिडणार आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, बॉबी देओलचा 'कांगुवा' आणि विक्रांत मेस्सीचा 'साबरमती रिपोर्ट' हे चित्रपट 'आय वॉन्ट टू टॉक'च्या आठवडाभर आधी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. २२ नोव्हेंबरला हरीश खन्ना आणि मृणाल कुलकर्णी यांचा 'ढाई आखर' हा चित्रपट 'आय वॉन्ट टू टॉक' सोबत रिलीज होणार आहे. आठवडाभरानंतर आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख आणि अनुराग बसू यांचा 'मेट्रो इन डेज' देखील बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.
संबंधित बातम्या