Suspense Film On OTT : वीकेंड जवळ येऊ लागला की, घरीच बसून एखादा चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा प्लॅन अनेकजण बनवत असतात. मात्र, अशावेळी नक्की काय बघावं हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला असतो. सोशल मीडियावर अनेक पर्याय शोधताना आपल्याला असा एखादा चित्रपट सापडतो की तो पाहिल्यावर वीकेंड धमाकेदर होऊन जातो. या आठवड्यात तुम्ही देखील असाच काही प्लॅन बनवत असाल, आणि एखादा सस्पेन्स चित्रपट बघणे तुम्हाला आवडत असेल, तर ओटीटीवर असलेला हा साऊथचा सिनेमा नक्कीच पाहू शकता.
साऊथचा अंडररेटेड सस्पेन्स थ्रिलर चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नसली, तरी या चित्रपटाची कथा नंबर वन आहे. 'पुष्पा २'मधील फहाद फासिल आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला असला, तरी तो आपण हिंदीत यूट्यूबवर पाहू शकता. हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाचे नाव 'अथिरन' असे आहे.
'अथिरन' या चित्रपटाची कथा हॉलिवूडच्या 'स्टोनहर्स्ट अॅसाइलम' या चित्रपटासारखीच असल्याचे बोलले जाते. मात्र, हा चित्रपट त्या चित्रपटाचा दाक्षिणात्य रिमेक नाही. विवेक दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन पीएफ मॅथ्यूज यांनी केले आहे.
'अथिरन' या चित्रपटाची कथा १९६७ पासून सुरू होते. लक्ष्मी जेव्हा तिच्या घरी पोहोचते तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलेले असतात. त्याचवेळी तिची भाची एक धाग्याचा तुकडा घेऊन या सगळ्यांमध्ये खेळत बसलेली दिसत आहे. नित्याची मानसिक स्थिती चांगली नसून, तिने या लोकांची हत्या केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर चित्रपटाची कथा पाच वर्षांचा लीप घेते. या दरम्यान फहाद फसिल जंगलाच्या मधोमध असलेल्या एका वेड्यांच्या रुग्णालयात तपास आणि चौकशीसाठी जातो. तिथे फहाद नित्याला भेटतो. जेव्हा डॉक्टरांना नित्याच्या भूतकाळाबद्दल कळते, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाते.
साई पल्लवी आणि फहाद फासिल यांच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर, आयएमडीबीवर या चित्रपटाला ६.७ रेटिंग मिळाले होते. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील स्ट्रीमिंग होत आहे. याशिवाय हा चित्रपट युट्युबवरही अगदी मोफत उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या