बॉलिवूड संगीतकार प्रीतमला लाखोंचा गंडा; ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी ४० लाख घेऊन फरार!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूड संगीतकार प्रीतमला लाखोंचा गंडा; ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी ४० लाख घेऊन फरार!

बॉलिवूड संगीतकार प्रीतमला लाखोंचा गंडा; ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी ४० लाख घेऊन फरार!

Published Feb 10, 2025 08:41 AM IST

Music Composer Pritam : संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या ऑफिसमधून ४० लाख रुपये चोरीला गेले आहेत. प्रीतमच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बॉलिवूड संगीतकार प्रीतमला लाखोंचा गंडा; ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी ४० लाख घेऊन फरार!
बॉलिवूड संगीतकार प्रीतमला लाखोंचा गंडा; ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी ४० लाख घेऊन फरार!

Theft in Pritam's office : बॉलिवूड संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या मुंबईतील ऑफिसमधून ४० लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी प्रीतमची मॅनेजर विनिता छेडा यांच्या लक्षात आली. आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेली रक्कम असलेली बॅग गायब झाल्याचे विनिता यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे असलेली बॅग काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त मुंबईतील ऑफिसमध्ये आणण्यात आली होती. विनिता छेडा यांनी हे पैसे प्रीतमचे माजी कर्मचारी आशिष सायल उपस्थित असलेल्या कार्यालयात ठेवले होते. प्रीतमच्या घरी पोहोचवतो, असे सांगून सायलने बॅग घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, विनिता छेडा यांनी आशिष सायल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे आढळून आले. जेव्हा ते तातडीने आशिषच्या घरी पोहोचले, तेव्हा तो घरी देखील सापडला नाही. यानंतर विनिता छेडा यांनी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला असूनम, तपास सुरू आहे. सध्या पोलिस सायलचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप त्याच्याबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. आशिष सायल गेल्या ६ वर्षांपासून प्रीतमसोबत काम करत होता.

Aarushi Nishank: चित्रपटात काम देण्याच्या बहाण्यानं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ४ कोटींचा गंडा

नेमकं काय झालं?

या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी म्हटले की, पैशांनी भरलेली बॅग मिळाल्यानंतर, मॅनेजरने ती ट्रॉली बॅगमध्ये ठेवली. मग, ती त्याच इमारतीत राहणाऱ्या प्रीतमच्या फ्लॅटवर काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी गेली. मॅनेजर परत आली तेव्हा तिला आढळले की, ट्रॉली बॅगमध्ये पैसेच नव्हते. तिने ताबडतोब इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली आणि तिला कळले की, आशिष प्रीतमच्या घरी जाण्याच्या बहाण्याने पैसे असलेली बॅग घेऊन स्टुडिओतून निघून गेला होता. मॅनेजरने आशिषशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, पण तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे. त्यानंतर मॅनेजरने प्रीतमला घटनेची माहिती दिली, आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

कोण आहे संगीतकार प्रीतम?

'बर्फी', 'ये जवानी है दिवानी', 'जब वी मेट', 'लव्ह आज कल', 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'ब्रह्मास्त्र' यांसारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय संगीत देणारा संगीतकार प्रीतम चक्रवर्ती बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहे. त्याची गाणी प्रत्येक पिढीतील संगीतप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याच्या माधुर्य आणि अनोख्या संगीत शैलीमुळे त्याला इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली आहे.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner