मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gabh Marathi Movie : सगळीकडेच होतेय ‘गाभ’ या मराठी चित्रपटाची चर्चा! काय आहे याचे हटके कथानक?

Gabh Marathi Movie : सगळीकडेच होतेय ‘गाभ’ या मराठी चित्रपटाची चर्चा! काय आहे याचे हटके कथानक?

Jun 25, 2024 09:14 AM IST

Gabh Marathi Movie: ‘गाभ’ या चित्रपटातून एक हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटात असं काय खास आहे? चला जाणून घेऊया...

सगळीकडेच होतेय ‘गाभ’ या मराठी चित्रपटाची चर्चा! काय आहे याचं हटके कथानक?
सगळीकडेच होतेय ‘गाभ’ या मराठी चित्रपटाची चर्चा! काय आहे याचं हटके कथानक?

Gabh Marathi Movie: सध्या मराठी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या विषयावरचे हटके चित्रपट बनताना पाहायला मिळत आहेत. हॉरर, थ्रिलर, रोमान्ससोबतच आता वास्तवदर्शी चित्रपटांना देखील विशेष महत्त्व मिळू लागलं आहे. शिवाय अशी खरी सत्य परिस्थिती दाखवणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. असाच एक चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. ‘गाभ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटातून एक हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटात असं काय खास आहे? चला जाणून घेऊया...

गावखेड्यातील सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. समाजातील वास्तव मांडणारे असे हे चित्रपट मनोरंजनासोबतच समाजाचं कटू सत्य देखील सगळ्यांसमोर सादर करण्याचं काम करत असतात. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांतून नावाजल्या गेलेल्या ‘गाभ’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट २१ जून रोजी रिलीज झाला आहे. ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.

TRP Report: मालिका संपल्यानंतरही टीआरपीत झळकली! पाहा ‘या’ आठवड्यात कोणत्या मराठी मालिकांनी मारली बाजी

काय आहे चित्रपटाचं कथानक?

मनुष्य आणि प्राणी यांना केंद्रस्थानी ठेवून ‘गाभ’ या मराठी चित्रपटाची कथा मांडली आहे. या चित्रपटाची कथा समाजातील एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते. या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अभिनेता कैलास वाघमारे याने आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारली आहे. स्वत:च्या म्हशीसाठी एका रेड्याचा शोध घेताना माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, हळव्या प्रेमाच्या माध्यमातून दाखवणारा गावच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ चित्रपट आहे. म्हशी आणि रेड्याच्या मिलनात एक माणूस म्हणून दादूमध्ये काय बदल घडतात, हे या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिग्गजांची फौज!

‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे, तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून, पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गानू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे.

WhatsApp channel